बिबट्याच्या हल्यात देवगावला महिला ठार

2 hours ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

12 Oct 2024, 6:53 am

Updated on

12 Oct 2024, 6:53 am

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा : शेतात मका तोडण्यासाठी गेलेल्या महिलेवर तेथेच दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. यात महिलेचा मृत्यू झाला. तालुक्यातील देवगाव येथे शुक्रवारी (दि. ११) सायंकाळी ही घटना घडली, योगीता आकाश पानसरे (वय ४०) असे मृत महिलेचे नाव असल्याची माहिती वन अधिकारी सचिन लोंढे यांनी दिली.

वन विभागाकडून मिळालेली माहिती अशी: देवगाव शिवारात पानोबा वस्ती आहे. तेथे योगीता व पती आकाश यांना तीन मुले शेती करून दुग्धव्यवसाय करतात. शुक्रवारी सकाळी सर्व जण आपल्या आपल्या कामावर गेले. सायंकाळी योगीता यांचे नेहमीप्रमाणे काम सुरू होते. घरातील सर्व कामे आवरून घराशेजारी असणाऱ्या मक्याच्या शेतात गेल्या. मात्र अगोदरच तेथे बिबट्या दबा धरून बसला होता. त्याची चाहूल कोणालाही लागली नाही.

योगीता मका तोडण्यात व्यस्त होत्या. त्याच वेळी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला, त्यांनी आरडाओरडा केला, शेजारी घास कापणाऱ्या काही महिलांनी हा आवाज ऐकल्यानंतर मोठा आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्याने तेथून धूम ठोकली. मात्र योगीता गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषत केले.

महिनाभरात दुसरा बळी

याच गावात महिनाभरापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार झाली होती. काल पुन्हा ही घटना घडल्याने वन विभागाबाबत नाराजी आहे.

वन अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले म्हणून...

हा बिबट्या सकाळी याच वस्तीवर दिसला होता. यासंदर्भात वनरक्षकांना फोन करून व्हिडीओदेखील टाकला होता. मात्र, त्यांनी या व्हिडीओकडे दुर्लक्ष केले. वनाधिकाऱ्यांनी दखल घेतली असती तर या महिलेचा बळी गेला नसता. त्यामुळे वन अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article