खरा दसरा मेळावा शिवतीर्थावरच, इतर ठिकाणी डुप्लिकेट:पक्षाचे नाव चिन्ह चोरलं तरी जनता ठाकरेंसोबत- संजय राऊत

2 hours ago 1
दसरा मेळाव्यांची लाट आली आहे. प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचे अधिकार आहे. पण शिवसेनेचा खरा दसरा मेळावा हा शिवतीर्थावर होत आहे. आता डुप्लिकेट लोकं खूप येत आहे, मेळावे करत आहे. जी शिवसेना दिवगंत बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केली ती परंपरा उद्धव ठाकरेंनी कायम ठेवली आहे, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र डागले आहे. संजय राऊत म्हणाले की, त्यांनी पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरले तरी राज्यातील जनता ही खऱ्या शिवसेनेसोबत आहे. निवडणूक आयोग शिवसेना कुणाची हे ठरवू शकत नाही. मोदी- शहा यांच्या मेहरबानीवर चालणाऱ्यांना शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा अधिकार नाही. हा निर्णय जनतेने घेतला आहे. डुप्लिकेट शिवसेनेचे काही लोक भाड्याने माणसे जमवून दसरा मेळावा घेतील असा टोलाही त्यांनी लगावला आहे. परंपरा उद्धव ठाकरेंनी जपली संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली. त्यांनी दसरा मेळाव्याची सुरुवात केली. त्यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर देशाला विचाराचे सोने दिले, ती परंपरा उद्धव ठाकरे यांनी जपली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article