दसऱ्याचा मुहूर्त .:शेतकऱ्यांना 60 रुपये किलोचा दर, बाजारात 80 चा भाव, आवक कमीच, पैठणसह सिल्लोड बाजारात गतवर्षीच्या तुलनेत आवक घटली

2 hours ago 1
लासूरगाव येथे झेंडू फुलला नवरात्र उत्सवातील नऊ दिवस देवी दाक्षायणी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून फुलांची मागणी वाढली होती. आता शनिवारी झेंडूच्या फुलाची मागणी अधिकची असते. सध्या बाजारात ४० ते ५० रुपये किलो दराने भाव असून शनिवारी त्यात वाढ होईल. प्रतिनिधी | पैठण मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या दसऱ्याच्या मुहूर्तावर झेंडूच्या फुलांना चांगला भाव आहे. मात्र बहुतांश ठिकाणी अधूनमधून होत असलेल्या पावसामुळे फुलांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना ६० रुपये तर बाजारात आता ८० रुपयांवर भाव पोहचले आहे. त्यामुळे यंदा बाजारात झेंडूच्या फुलांची आवक कमी झाली आहे. पैठण तालुक्यातील वाघाडी येथील शेतकरी राजू कर्डिले यांनी एक एकरमध्ये लावलेले झेंडू अडीच टन झाले असल्याचे या शेतकऱ्याने सांगितले. पैठण तालुक्यात आजपर्यंत नगर जिल्ह्यातून दर दसऱ्याला झेंडूची फुले विक्रीसाठी अधिक प्रमाणात येतात. यंदा मात्र पैठण तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड केली. लागवडीनंतर साधारणत ५० ते ५५ दिवसांनी फुले काढण्यास सुरुवात होते. सध्या किरकोळ बाजारात ६० ते ७० रुपये किलोने फुले विकली गेली. आज दुसऱ्याच्या दिवशी दिवशी मात्र हेच दर ८० ते १०० रुपयांच्या घरात जातील असे सिल्लोड | तालुक्यात पडलेल्या अति पावसामुळे मोठ्या प्रमाणात झेंडूची फुले खराब झाली. यामुळे मोठे नुकसान झाले. याच पावसामुळे यंदा सिल्लोडला झेंडू फुलांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. बाजारपेठेत ८ क्विंटल झेंडू फुलांची आवक झाली असून ८० रुपये किलोप्रमाणे दसऱ्याच्या पूर्वसंध्येला फुलांची विक्री सुरू झाली आहे. तालुक्यात दरवर्षी झेंडू लागवड होत असते. १५ दिवसांपासून पावसामुळे नुकसान झाले आहे. फुलविक्रेते कृष्णा भुजबळ यांनी सांगितले. पैठण तालुक्यातील दरवर्षी साधारणत: शंभर ते दोनशे एकरवर झेंडूची लागवड होते. यंदा लागवड वाढली आहे. विजयादशमीला झेंडूला घाऊक बाजारात ६० ते ८० रुपये भाव मिळेल अशी उत्पादकांना अपेक्षा आहे. किरकोळ बाजारात दसऱ्याला झेंडूची फुले शंभरी गाठू शकतील.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article