कोल्ही मध्यम प्रकल्पातील सांडव्यातून तब्बल चार वर्षांनंतर बाहेर पडले पाणी:खंडाळा, कोल्ही, शिऊर, आलापूरवाडी, सफियाबादवाडीला फायदा

2 hours ago 1
वैजापूर तालुक्यातील खंडाळा परिसर वरुणराजाच्या हुलकावणीमुळे नेहमीच दुष्काळात भरडला जातो. दरवर्षी शेतकऱ्यांसह नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. खंडाळा, कोल्ही, आलापूरवाडी, शिऊर आदी गावांना पाणीपुरवठा करणारा कोल्ही येथील मध्यम प्रकल्पात गेल्या पाच वर्षांपासून भरलाच नसल्याने पाणीटंचाईचा त्रास सहन करावा लागला. परंतु या वर्षी वरुणराजाने चांगलीच कृपा केल्याने तीन ते चार वर्षांपासून आटलेला कोल्ही प्रकल्प ओव्हरफ्लो होऊन सांडव्यातून पाणी वाहत असल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. यावर्षी पावसाने परिसरात जोरदार हजेरी लावल्याने या परिसरातील लहान-मोठ्या प्रकल्पातही चांगले पाणी आल्याने परिसरातील शेतकऱ्यांबरोबर नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने प्रकल्पाजवळील या गावांना मोठा दिलासा मिळाला आहे. या परिसरात पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे विहिरीमध्ये कमी प्रमाणात पाणी होते. हे पाणी दोन महिनेही पुरवणे शक्य नव्हते. यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले होते, परंतु जानेफळ, हिलालपूर, कोरडगाव या परिसरात सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पावसाचे संपूर्ण पाणी प्रकल्पात आले असल्याने प्रकल्प पूर्णपणे शंभर टक्के भरला. खंडाळा, कोल्ही, आलापूरवाडी, शिऊर आदी गावांना पाणीपुरवठा करणारा कोल्ही येथील मध्यम प्रकल्पाच्या कामाला १९६१ मध्ये सुरुवात झाली होती आणि या प्रकल्पाचे १९६५ मध्ये काम पूर्ण होऊन १७ डिसेंबर १९६५ रोजी रोटेशनचे कॅनॉलला पहिल्यांदा पाणी सोडण्यात आले. यावर्षी शंभर टक्के भरलेला कोल्ही प्रकल्प कोल्ही प्रकल्प उभारल्यापासून या भागातील बहुतांश क्षेत्र ओलिताखाली आल्याने उत्पन्नात वाढ झाली आहे, परंतु पावसाचे प्रमाण कमी अधिक असल्याने दर वर्षी प्रकल्प भरत नाही त्यामुळे पाणीटंचाईची समस्या भेडसावते, अशी माहिती कोल्ही येथील व्ही.एम.मगर यांनी दिली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article