पंढरपूर महसूल विभागाचे भरारी पथक तसेच पंढरपूर पोलिस यांनी संयुक्तपणे पंढरपूर येथील भीमा नदीपात्रात वाळू चोरीसाठी वापरण्यात येणाऱ्या १७ लाकडी होड्या कटरच्या साह्याने नष्ट केल्या. तसेच अवैध वाळू उत्खनन करण्यासाठी वापरण्यात ट्रॅक्टर यारीसह जप्त करण्यात आला असल्याची माहिती तहसिलदार सचिन लंगुटे यांनी दिली. प्रांताधिकारी सचिन इथापे व तहसिलदार सचिन लंगुटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. दि. २६ नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथील भीमा नदी पात्रात अवैध वाळू उत्खनन करण्यासाठी वापरण्यात येणारा ट्रॅक्टरवर कारवाई केली असून, सदर ट्रॅक्टर यारीसह जप्त करण्यात आला आहे. तसेच २७ नोव्हेंबर रोजी पंढरपूर, इसबावी, शिरढोण, चिंचोली भोसे दरम्यान असणाऱ्या भीमा नदी पात्रात वाळू चोरी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एकूण १२ लाकडी होड्या कटरच्या साह्याने कापून नादुरुस्त करून नष्ट करण्यात आल्या आहेत, तसेच चळे येथे ५ लाकडी होड्या जेसीबीने नष्ट करण्यात आल्या आहेत. या पथकाची कारवाई... या भरारी पथकात मंडळ अधिकारी विजय शिवशरण, पंकज राठोड, ग्राम महसूल अधिकारी अमर पाटील, प्रमोद खंडागळे , महेश सावंत, गणेश पिसे, संजय खंडागळे तसेच पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पो. कॉ सचिन इंगळे, सचिन हेंबाडे, सिरमा गोडसे, निलेश कांबळे सहभागी होते. महसूल आणि पोलिस प्रशासन महिन्या, दोन महिन्यातून अशा प्रकारे अवैध वाळू उपसा बंद करण्यासाठी कारवाईचा फार्स करतात. मात्र त्यानंतर पुन्हा लगेचच ही वाळू तस्करी चालू होते. इसाबावी, चिंचोली भोसे, भटुंबरे, शेगाव दुमाला, गोपाळपूर, मुंढेवाडी भागात दिवसा ढवळ्या भीमा नदीत होड्या चालतात आणि पंढरपूर शहरात या वाळूची वाहतूक केली जाते. वाळू लिलाव बंद असतानाही शहरात रस्त्यावर वाळूचे ढिगारे पडलेले असतात मात्र त्यावर कधी कारवाई होत नाही. त्यामुळे भीमा नदीतून वाळूची अवैध तस्करी जोमात सुरूच राहत असल्याचा अनुभव आहे. ११ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत ट्रॅक्टर, यारी, १७ होड्या असा ११.५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यापैकी सुमारे साडे सात लाख रुपये किमतीच्या १७ होड्या कापून आणि जाळून नष्ट करण्यात आल्या आहेत, अशी माहिती महसूलकडून देण्यात आली.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)