पक्षाची स्वबळाची चाचपणी:विधानसभा निवडणूक; सर्व जागांसाठी इच्छुकांच्या काँग्रेसने घेतल्या मुलाखती

2 hours ago 1
लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पाच पैकी दोन विधानसभा मतदारसंघात मताधिक्य घेतलेल्या काँग्रेसकडून आगामी विधानसभा निवडणुसासाठी सर्वच मतदारसंघासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. शनिवारी एकूण ४० इच्छुकांनी मुलाखती दिल्या. ‘अकोला पश्चिम’वरून शिवसेना विरुद्ध काँग्रेस असे पोस्टर वॉर रंगले असून, स्वबळाच्या चाचपणीची चर्चा राजकीय वर्तुळात मुलाखतीच्यानिमित्तान े सुरु झाली आहे. महाविकास आघाडीत जास्तीत-जास्त व सोयीचे मतदारसंघ मिळावेत, यासाठी दबाव तंत्राचा भाग असल्याचेही विश्लेषकांचे मत आहे. ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. उर्वरित. पान ४ अकोला पश्चिम मतदारसंघासाठी सर्वाधिक रस्सीखेच सन २०१९च्या निवडणुकीत अकोला पश्चिममध्ये भाजपला ७३ हजार २६२, कांॅग्रेसला ७० हजार ६६९ मते मिळाली होती. यावेळी लोकसभा निवडणुकीत पश्चिममध्ये कॉग्रेसला ८४३२३ तर भाजपला ७२२५२ मते मिळाली. त्यामुळे पश्चिमसाठी कांॅग्रेसमध्ये १९ जणांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज केला. त्यापैकी १७ जण मुलाखतीसाठी होते. अकोटसाठी १०, बाळापूर-२, अकोला पूर्व-६ व मूर्तिजापूरसाठी ५ जणांनी मुलाखती दिल्या.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article