पथनाट्यातून स्वच्छता अन् पर्यावरण संवर्धनाचा जागर:कौटुंबिक न्यायालय व कौटुंबिक न्यायालय वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान

2 hours ago 1
‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत कौटुंबिक न्यायालय आणि कौटुंबिक न्यायालय वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्वच्छता अभियानानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमातून सार्वजनिक स्वच्छतेबाबत जागृती करण्यात आली. सीएसआरडी महाविद्यालयातील ग्रामविकास अध्ययन व संशोधन केंद्रातील युवक-युवतींनी सार्वजनिक स्वच्छता व पर्यावरणावर जागृतीवर पथनाट्याचे सादरीकरण केले. ‘स्वच्छतेची सुरुवात माझ्यापासून’ या पथनाट्याचे सादरीकरण करुन सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व विशद केले. तसेच, पर्यावरणाच्या गंभीर प्रश्‍नावर जागृती करुन ‘झाडे लावा, झाडे जगवा’ संदेश देण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून औद्योगिक न्यायालयाच्या न्यायाधीश समीना खान, कामगार न्यायालयाचे (द्वितीय) न्यायधीश ए. जी. देशमुख, सहकार न्यायालयाचे न्यायाधीश बी. एस. लखोटे, कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष ॲड. लक्ष्मण कचरे, उपाध्यक्ष ॲड. सुरेश लगड, कार्याध्यक्ष ॲड. शिवाजी सांगळे, सचिव ॲड. राजेश कावरे आदी उपस्थित होते. कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश संगीता ना. भालेराव म्हणाल्या, की सार्वजनिक स्वच्छता व पर्यावरणाच्या प्रश्‍नावर सर्वांनी दक्ष राहावे. प्रत्येकाने स्वच्छतेची सुरुवात स्वत:चे घर व परिसरापासून केल्यास संपूर्ण शहर स्वच्छ होणार आहे. पर्यावरणाच्या प्रश्‍नावर जागृत राहून समाजात जागृतता निर्माण करावी. पर्यावरण व स्वच्छतेसाठी शासन जबाबदारी पार पाडत असून, नागरिकांनीही कर्तव्य म्हणून योगदान देण्याचे आवाहन भालेराव यांनी केले. प्रास्ताविकात ॲड. लक्ष्मण कचरे यांनी सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व विशद करुन पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी भूमिका घेण्याचे स्पष्ट केले. ॲड. शिवाजी कराळे व अर्चना झिंजे यांनी विनोदी पथनाट्यातून स्वच्छतेचा संदेश दिला. ॲड. सुरेश लगड म्हणाले की, अस्वच्छतेचे प्रमाण वाढल्याने रोगराई पसरत आहे. ही रोगराई रोखण्यासाठी व निरोगी जीवनासाठी स्वच्छता आवश्‍यक आहे. घर व परिसरापासून स्वच्छतेला प्रारंभ करण्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन शिवाजी सांगळे यांनी, सचिव ॲड. राजेश कावरे यांनी आभार मानले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article