हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचा कार्यकर्त्यांना शब्द, म्हणाले…

2 hours ago 1

Sharad Pawar connected Harshvardhan Patil : भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादी पक्षात घेणार का? यावर शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. शरद पवारांनी कार्यकर्त्यांना शब्द दिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. वाचा सविस्तर...

हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचा कार्यकर्त्यांना शब्द, म्हणाले...

शरद पवार, हर्षवर्धन पाटीलImage Credit source: Facebook

| Updated on: Sep 29, 2024 | 10:50 AM

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. यावर शरद पवार यांनी स्वत: स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे. स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच निर्णय घेऊ, असं शरद पवार म्हणालेत.

राज्यात सगळीकडे विधानसभा निवडणुकीचं वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान 400 जागा निवडून येतील असं सांगत होते. त्यामुळे वेगळं वातावरण तयार झालं होतं. महाराष्ट्र राज्यात मात्र वातावरण वेगळं होतं. आम्ही तीन पक्ष एकत्र आलो. त्यावेळेस माझ्या वाचनात आले की यांचे बोटावर मोजण्याइतके लोक निवडून येणार नाहीत. तरुण पिढी आणि सर्वसामान्य यांच्याशी आमची नाळ जोडून आहे. सर्वसामान्य लोकांच्या कष्टाने लोकसभेला महाविकास आघाडीच्या 31 जागा निवडून आल्या. 10 पैकी 8 जागा राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार निवडून आले. लोकांची मतं जुळून आली. त्यामुळे हे शक्य झालं, असं शरद पवार म्हणाले.

बातमी अपडेट होत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article