Published on
:
08 Oct 2024, 2:31 pm
Updated on
:
08 Oct 2024, 2:31 pm
सोनपेठ : सोनपेठ शहरातील एका इंग्रजी शाळेत ५ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याची तक्रार चिमुकलीच्या आईने सोनपेठ पोलीस ठाणे दिली. त्यानुसार आज (दि.८) पोक्सो अंतर्गत अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित चिमुकलीच्या आईच्या तक्रारीनुसार चिमुकली शनिवारी (दि.५) शाळेतून घरी आल्यानंतर तिच्या शरीरावर ओरखडलेल्या जखमा दिसत होत्या. त्यानंतर चिमुकलीच्या आईने तिला रुग्णालयात नेले असता संबंधित डॉक्टरांनी मुलीवर अत्याचार झाल्याचे सांगत पुढील उपचारासाठी पाठवले. या प्रकरणात संबंधित पीडित मुलीच्या आईने तक्रार दाखल केलेल्या प्रकरणात सोनपेठ पोलीस ठाणे व परभणी जिल्हा पोलीस प्रशासन यांनी ६ पथके नेमून तपास यंत्रणा कार्यरत केलेली आहे. या प्रकरणाचा तपास सोनपेठ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बोलमवाड यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत.