पराभव समोर दिसताच भाजपचा रडीचा डाव:धार्मिक व जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, विजय वडेट्टीवारांची टीका

2 hours ago 2
भाजप आमदार नीतेश राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी चांगलाच समाचार घेतला. भाजपच्या नेत्यांनी दिलेल्या अजेंड्याप्रमाणे ते बोलत आहेत. असे वादग्रस्त वक्तव्य करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू आहे. पराभव समोर दिसताच भाजपचा रडीचा डाव सुरू आहे, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, भाजप निवडणुका हरत आहे. त्यामुळे मतांच्या ध्रुवीकरणासाठी धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याची भाजपची नीती असून तेच नितेश राणे यांच्या मुखातून बाहेर येत आहे. नीतेश राणे दोन धर्मांत आग लावण्याचे काम करतात विजय वडेट्टीवार म्हणाले की, नितेश राणे यांनी काँग्रेसमध्ये असताना हाफ चड्डीवाले जातीयवादी आहेत. ते आरक्षण देउ शकत नाही, अशी टीका आरएसएसवर केली होती. मात्र आता सत्तेच्या खुर्चीवर असताना ते दोन धर्मांत आग लावण्याचे काम करत असतील तर सरकारने त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी. परंतु, त्यासंदर्भात शासनाची भूमिका स्पष्ट होत नाही. याचा अर्थ भाजपला महाराष्ट्रात दंगली घडवून, राज्य अस्थिर करायचे आहे. निष्पाप लोकांचा जीव घ्यायचा आहे. ही भाजपची सत्तेसाठी असलेली नीती आहे. पराभव समोर दिसत असल्याने भाजपचा रडीचा डाव महाराष्ट्रात भाजपला निवडणूक नको असेल तर त्यांच्याकडून दंगली घडवल्या जातील. त्यामुळे महाराष्ट्र अस्थिर आहे, म्हणून निवडणुका पुढे ढकला, असा अहवाल राज्यपालांमार्फत देउ शकतात. लाडकी बहीण योजना आणूनही आपला पराभव पुढे दिसत असल्याने असा रडीचा डाव खेळला जात आहे. जितक्या निवडणुका लांबणीवर टाकताल, तितकी महाविकास आघाडी भक्कम होईल, असा विश्वास देखील वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article