'परिवर्तन महाशक्ती'च्या 150 जागा ठरल्या:सुकाणू समितीच्या बैठकीत एकमत, माजी खासदार राजू शेट्टी यांची माहिती

2 hours ago 1
परिवर्तन महाशक्तीच्या निमित्ताने विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या तिसऱ्या आघाडीने गुरुवारी आपल्या 150 जागांवर एकमत झाल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार हे जागावाटप फायनल होऊन उमेदवारांच्या नावांची घोषणा पुढील काही दिवसांत होण्याची शक्यता आहे. 'परिवर्तन महाशक्ती' सुकानु समिती बैठक आज पार पडली. कोणता पक्ष किती जागा लढणार याबाबत चर्चा झाली आणि १५० जागांवर पहिल्या बैठकीत एकमत झाले आहे. कोणताही वाद आमच्यात झाला नाही. उर्वरित जागा पुढील बैठकीत चर्चा करू. समाजातील सर्वसामान्य लोक आज आमच्या सोबत असून प्रस्थापित २०० ते २५० घराणे विरुद्ध सामान्य असा हा लढा आहे. प्रस्थापित यांनी कधी सामान्य आश्वासक चेहरा पुढे येऊन दिला नाही. अनेक वर्ष आमची चळवळ केली असून सक्षमपणे आम्ही उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवणार आहे, असे मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. 'परिवर्तन महाशक्ती' ची २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नियोजन बैठक संपन्न झाल्यानंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेसाठी छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी, शंकरअण्णा धोंडगे, वामनराव चटप व समविचारी नेते उपस्थित होते. राजू शेट्टी म्हणाले, महायुती आणि महाविकास आघाडी ही वेगवेगळे रंगाचे पॅकेज असून ते एकच आहे. स्वच्छ चारित्र्य आणि मतदारसंघाचं विकास यानुसार उमेदवारी दिली जाणार आहे. राज्यातील ३० ते ४० संस्था आमच्या सोबत आहे. छत्रपती संभाजीराजे म्हणाले, मनोज जारांगे यांच्या सोबत माझे बोलणे झाले आहे. त्यांच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. त्यांनी निर्णय लवकर घ्यावा. आमच्या सोबत यावे किंवा त्यांचे उमेदवार उभे करावेत. २० ऑक्टोंबर रोजी त्यांची बैठक आहे त्यात ते निर्णय घेतील. सर्व समाज सोबत घेऊन पुढे गेले पाहिजे. बच्चू कडू म्हणाले, कष्टकरी यांना न्याय देण्यासाठी आम्ही निवडणुकीस सामोरे जात आहे. भाजप आणि काँग्रेस हे एक सारखेच असून ते धार्मिक राजकारण करत आहे. आम्हाला राज्याचे बजेट हे सर्वसामान्य जनतेच्या हक्काचे बजेट करायचे आहे. कोणता एक झेंडा हाती न घेता आम्ही सर्व जणांना सोबत घेऊन राजकारण करणार आहे. शरद पवार सत्तेत असताना परिवर्तन आणु शकले नाही ते आज कसले परिवर्तन भाषा करत आहे. आम्ही तिसरी आघाडी नाही तर पहिली आघाडी होऊ.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article