पर्वतीवर पानिपत मातीचे पूजन:तुळशी वृंदावन स्थापनेसह पेशवे परिवाराच्या उपस्थितीत धनुर्मास उत्सवाचे आयोजन

6 days ago 2
धनुर्मास निमित्ताने पर्वतीवर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्री देवदेवेश्वर संस्थान पर्वती आणि कोथरूड यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पानिपत येथील पवित्र मातीचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाला पेशवे परिवारातील जयमंगलादेवी पेशवे, सुचेतादेवी पेशवे यांच्यासह प्रमुख सदस्य उपस्थित होते. ज्येष्ठ मूर्तिशास्त्र अभ्यासक डॉ. गो.बं. देगलूरकर, संस्थानचे मुख्य विश्वस्त रमेश भागवत, विश्वस्त पुष्कर पेशवे, सुधीर पंडित, जगन्नाथ लडकत, आशिष कुलकर्णी आणि पूजा पेशवे यांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली. पर्वतीवरील पानिपत चौकात तुळशी वृंदावनाची स्थापना करण्यात आली असून त्यामध्ये तुळशीचे रोपण करण्यात आले. या ठिकाणी महाराष्ट्राच्या इतिहासातील इ.स. १ पासूनच्या महत्त्वपूर्ण घटनांची भित्तिचित्रेही साकारण्यात आली आहेत. ही कामे आमदार माधुरी मिसाळ यांच्या विकास निधीतून पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती मुख्य विश्वस्त रमेश भागवत यांनी दिली. कार्यक्रमानिमित्त पुणेकरांसाठी पर्वती वारसा सहलीचेही आयोजन करण्यात आले होते. या सहलीत श्री देवदेवेश्वर मंदिर, विष्णू मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिर, कार्तिकस्वामी मंदिर आणि श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे व श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या पुतळ्यांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या समारोपी भोजन प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article