पशुगणना सुरू; प्रगणकास सहकार्य करा- जिल्हाधिकारी:जिल्हास्तरीय प्राणिक्लेश प्रतिबंधक समितीची घेतली सभा

1 hour ago 1
राज्यातील पशुगणनेला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. सांख्यिकी माहितीसाठी ही पशुगणना अचूक होणे आवश्यक आहे. त्यामुळे पशुगणनेसाठी पशुपालक, गोशाळा चालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे. जिल्हास्तरीय प्राणिक्लेश प्रतिबंधक समितीची सभा सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. संजय कावरे, महापालिका उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, परिवहन विभागाचे सिद्धार्थ ठोके यांच्यासह अशासकीय सदस्य उपस्थित होते. पशूंची संख्या माहीत व्हावी, यासाठी दर पाच वर्षांनी पशूगणना होते. यासाठी प्रगणकाची नियुक्ती करण्यात आली आहे. पशुपालकांनी सहकार्य करावे. तसेच जिल्ह्यात जनावरांचे १०० टक्के रोगप्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे. अशासकीय सदस्यांना कामकाजासाठी कार्यालयात जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच बँक खातेही उघडण्यात आले आहे. त्यामुळे समितीचे कामकाज करणे सुलभ होणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article