पहिल्या माळेस हजारो भाविक रेणुकामाता चरणी नतमस्तक:तहसीलदार कुलकर्णी‎ यांच्या हस्ते घटस्थापना‎

2 hours ago 1
चांदवड येथील रेणुकामातेचे नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच माळेला हजारो भाविकांनी दर्शन घेतले. रात्री १२ वाजता कळस व ध्वजपूजन केल्यानंतर मंदिरात पहाटे महाभिषेक व महापूजा होऊन तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्या हस्ते सपत्नीक घटस्थापना करण्यात आली. रेणुका मातेला पिवळ्या रंगाची पैठणी नेसवत मुकूट व विविध आभूषणे चढवण्यात आली. मंदिराच्या गाभाऱ्यात व सभामंडपात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. न्यायाधीश व सहन्यायाधीश यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. नवरात्रोत्सवात दररोज सायंकाळी साडेआठला विविध मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात येणार आहे. महाअभिषेक, पालखी मिरवणूक, महाआरती, होमहवन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांना माथा व पायथ्यापासून येण्यासाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. गर्दीच्या नियोजनासाठी प्रत्येक भाविकास गाभाऱ्यामध्ये रांगेतून प्रवेश देण्यात येत होता. मंदिर प्रांगण व हॉलमध्ये बॅरिकेडिंग व्यवस्था करण्यात आल्याने गर्दीचे; योग्य प्रकारे नियोजन झाले आहे. घटी बसणाऱ्या महिलांची व्यवस्था ६ सभागृहात करण्यात आली आहे. मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोलिस मदत केंद्र उभारण्यात आले आहे. मंदिर ट्रस्टतर्फे वाहनतळ, पाणी, सुलभ शौचालय, विजेचे दिवे, आरोग्य सुविधा पुरवण्यात येत आहे. आर. पी. चोरडिया हॉस्पिटलचे वैद्यकीय उपचार केंद्र २४ तास सेवा उपलब्ध देणार आहे. नवरात्रोत्सव यशस्वितेसाठी ट्रस्टचे व्यवस्थापक मधुकर पवार, सहायक व्यवस्थापक सुभाष पवार, विलास पवार, पुजारी विजय जोशी, हरेंद्र वैद्य, अमोल कुलकर्णी रेणुका देवी सेवा मंडळ, चंद्रेश्वर सेवा भक्त मंडळाचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. चांदवड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article