पाचोरा-बोदवड ब्रॉडगेज रेल्वेसाठी स्थळ निरीक्षण:आठ महिन्यांत भूसंपादनावर भर, महसूल, भूमी-अभिलेख, कृषी व वन विभागांच्या पथकाने घेतल्या नोंदी
3 hours ago
2
पाचोरा-जामनेर- बोदवड या रेल्वे मार्गाचे रुंदीकरण व जामनेर- बोदवड रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. यासाठी भूसंपादनाच्या कामाला गती मिळाली असून बुधवारी विशेष भूसंपादन अधिकारी निवृत्ती गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थळ निरीक्षण करण्यात आले. रेल्वे, महसूल भूमि अभिलेख विभाग, कृषी विभाग, व वन विभागाच्या संयुक्त पथकाने स्थळ निरीक्षण करून नोंदी घेतल्या.या ब्रॉडगेज रेल्वे मार्गातील मालमत्तांचे बुधवारी विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रेल्वे मार्गातील मालमत्तांचे येत्या आठ महिन्यात भूसंपादन करण्याचे उद्दिष्ट यावेळी अधिकाऱ्यांनी बोलून दाखवले. पाचोरा - जामनेर - बोदवड या ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे अंतर ८४ किमी आहे. त्यावर ‘प्रधानमंत्री गती शक्ती’ योजनेतून ९५५ कोटी रुपये खर्च होतील. रेल्वेसाठी शेतजमीन अधिग्रहण केली जाणार असल्याने काही शेतकऱ्यांनी वाढीव आर्थिक लाभाच्या लोभापोटी नियोजित रेल्वे मार्गात वृक्ष लागवड केली आहे. काही शेतकऱ्यांनी गोदाम किंवा घरे बांधली आहेत. मात्र पहिली अधिसूचना जारी झाल्यापासून तीन वर्षापूर्वीच्या सॅटेलाइट इमेज व ड्रोन कॅमेऱ्या द्वारे तपासणी करून लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे आर्थिक स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून वृक्ष लागवड किंवा बांधकाम केलेल्या शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळणार नसल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले. तीन वर्षांपूर्वीच्या सॅटेलाइट इमेज व ड्रोन कॅमेऱ्याद्वारे तपासणी मग लाभ आठ महिन्यांत भूसंपादन पूर्ण करू ^पाचोरा बोदवड रेल्वे मार्गावर सर्वाधिक क्षेत्र जामनेर तालुक्यातील संपादित करावे लागणार आहे. रेल्वे विस्तारीकरणासाठीची अधिसूचना जारी झाल्यापूर्वीच्या तीन वर्षातील व्यवहार तपासून नियमानुसार योग्य तो मोबदला देऊन संपादन केले जाणार आहे. वन विभाग कृषी विभाग महसूल विभाग यांनी वेळेत काम केल्यास आठ महिन्यात भूसंपादन पूर्ण करू. -निवृत्ती गायकवाड, विशेष भूसंपादन अधिकारी.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)