शिक्षण, आरोग्य आणि एआय

6 hours ago 1

<<< केतन जोशी >>>
meelketan gmail.com

आर्टिफिशिअल इंटेलिजन्सबद्दल किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल एक छान वाक्य वाचनात आलं. ते वाक्य असं होतं की- “By far, the greatest danger of Artificial Intelligence is that people conclude too early they understand it.” थोडक्यात, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय हे न समजताच त्याबद्दलचा बागुलबुवा निर्माण करणं सुरू आहे. Artificial Intelligence म्हणजे काय, हे समजून घेताना ‘इंटेलिजन्स’ किंवा बुद्धिमत्ता म्हणजे काय हे पहिलं समजून घ्यावं लागेल.

शिकत राहणं, प्रत्येक गोष्टीच्या मागे कार्यकारणभाव शोधत राहणं, त्यातून एखाद्या समस्येवर मात कशी करायची हे शिकणं, भाषा शिकून घेणं, आसपासचा भवताल समजून घेणं आणि या सगळ्यातून काही ना काही निर्णय घेणं, याला बुद्धिमत्ता किंवा इंटेलिजन्स म्हणतात. अगदी नेमक्या सगळ्या याच गोष्टी कॉम्प्युटर्स सायन्स आणि तंत्रज्ञान यांच्या संगमातून घडवून आणणं म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स.

आजच्या लेखाचा विषय हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा शिक्षण आणि आरोग्य यात काय घडतंय आणि घडेल असा जरी असला तरी किमान तरुण मुलामुलींनी यापुढे एखाद्या गोष्टीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला गेला आहे असं जर आढळलं तर हे नक्की कसं घडलं असेल आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरावी असं का वाटलं असेल याचा सातत्याने विचार करत रहा. तर शिक्षण आणि आरोग्य हे कुठल्याही समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे विषय. एक सहज म्हणून आठवा की शाळेत असताना एखादा विषय हा तुमच्यासाठी नावडता विषय असेल, समजा गणित हा विषय नावडता असेल. पण शाळेत विषय आहे म्हटल्यावर शिकण्याशिवाय पर्याय नाही. मग काय, वर्गात गणित शिकवताना जर शिक्षकांना ते सोपं करून सांगण्याची कला नसेल तर तो विषय अधिकच अवघड वाटायचा. मग आपल्या घरचे एखादा क्लास लावायचे. त्यात पण जर नाही कळलं तर आपण गणितापुढे हात टेकायचो.

आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात समजा गणित न आवडणारे किंवा न जमणाऱ्या मुलांशी बोलून त्यांना गणित आवडत नाही किंवा समजत नाही म्हणजे काय होतं याची फोड केली जाते. मग त्यांना तेच गणित चित्ररूपाने, एखाद्या गेमच्या रूपाने किंवा एखाद्या अ‍ॅनिमेशनच्या पद्धतीने शिकवलं जाईल. बरं हे करताना कृत्रिम बुद्धिमत्तेकडे एकूणच गणित न आवडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा पण डेटा असल्यामुळे कुठल्या विद्यार्थ्यांना काय पद्धतीने शिकवलं तर त्याला पटकन समजेल याचा तपशील पण तयार असतो. आणि हे सगळं कल्पनारंजन नाहीये, तर हे वास्तवात आलं आहे.

शालेय किंवा कुठल्याही अभ्यासक्रमाचं एक अ‍ॅप्लिकेशन तयार करून ते विद्यार्थ्यांना मोबाईलवर द्यायला सुरुवात झाली आहे. यात या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून 24 तास शिक्षण शक्य आहे आणि विद्यार्थ्याला तो विषय समजेपर्यंत त्याला तो विषय शिकवला जाईल. आता काही चॅटबॉट्स पण तयार केले गेलेत, ज्यात विद्यार्थ्यांना एखादा प्रश्न सुटत नसेल तर त्यांनी तो प्रश्न चॅटवर पाठवला तर त्याचं उत्तर त्याला समोर येईल. थोडक्यात शिक्षकांशी जसा विद्यार्थ्यांचा संवाद असतो, तसा संवाद सुरू राहतो.

भारतात दिव्यांग विद्यार्थ्यांचं शिक्षण हा खूपच मोठा चिंतेचा विषय आहे, पण स्पीच टू टेक्स्ट, म्हणजे बोलल्यानंतर तशी अक्षरं उमटणे किंवा टेक्स्ट टू स्पीचद्वारे म्हणजे जी अक्षरं आहेत त्याचा नाद म्हणजे ती ऐकू येणं हा कृत्रिम बुद्धिमत्तेने गाठलेला मोठा टप्पा आहे. आज भारतात विद्यार्थी आणि शिक्षकांचं प्रमाण अतिशय व्यस्त आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांशी शिक्षकांचा संवाद जवळपास अशक्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला एखादा विषय कळला आहे का नाही, हे न पाहताच त्याला पुढचा भाग शिकवला जातो. पुढचं पाठ आणि मागचं सपाट हे होण्याचा धोका अधिक असतो. पण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने विद्यार्थ्यांच्या नकळत परीक्षा घेऊन तो भाग त्याला समजला आहे का नाही, हेदेखील पाहिलं जातं.

आज ऑगमेंटेड रिअॅलिटी आणि व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीने इतका पुढचा शिक्षण असू दे की आरोग्य, कृत्रिम बुद्धिमत्ता धमाल आणणार आहे हे नक्की. अर्थात यांत जमा होणारा डेटा, त्याची गुप्तता, त्याचा वापर आणि त्यातून निर्माण होणाऱ्या नैतिक समस्या हे आहेतच. पण बदलाच्या प्रत्येक टप्प्यावर हे असे प्रश्न उभे ठाकतात आणि माणूसच त्याची योग्य ती उत्तरं शोधत पुढे जातो. चाकाचा शोध, विजेचा शोध आणि पुढे इंटरनेटचा शोध याने मानवी जीवन अंतर्बाह्य बदललं. या तिन्ही बदलांनी एकत्रितपणे जितकं मानवी आयुष्य बदललं त्यापेक्षा मोठा बदल कृत्रिम बुद्धिमत्ता आणणार हे नक्की.

टप्पा गाठला आहे की वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समोर व्हर्च्युअल रिअॅलिटीने एक अख्खं मानवी शरीरच उपलब्ध होईल आणि त्याला हवा तसा सराव करणं शक्य होत आहे. इतकंच काय, उद्या भूगोलात समजा जगातील वाळवंटी प्रदेश शिकवला जात असेल, तर व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीने अख्खं वाळवंटच विद्यार्थ्यांच्या समोर उभं करणं शक्य आहे. अगदी सोपं आणि सहज बघायला मिळणारं उदाहरण म्हणजे स्मार्ट वॉच, ज्यात आपण किती पावलं दिवसाला चाललो, आपल्या हृदयाचे ठोके योग्य पडत आहेत का नाहीयेत, समजा ते पडत नसतील तर आपल्याला त्याची सूचना देणं, आपल्या झोपेची गुणवत्ता कशी आहे इथपासून तुम्ही दीर्घ श्वास किती घेतले इथपर्यंत जे सगळं नोंदवून ठेवलं जातं, सांगितलं जातं ते कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावरच.

आयबीएमचं वॉट्सन हेल्थ किंवा गुगलचं डीपमाईंड असिस्टसारखं कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सॉफ्टवेअर कॅन्सर, डायबेटीससारखे आजार अगदी प्राथमिक अवस्थेत असतानाच त्याचं निदान करू शकतात. कृत्रिम बुद्धिमत्तेतलं रोबोटिक सर्जरी हे तर वरदानच म्हणावं लागेल. अमुक एका पेशीला झालेला संसर्ग बाकीच्या आसपासच्या पेशींना धक्का न लागता, बाधित पेशींवर उपचार हे फक्त रोबोटिक सर्जरीने शक्य आहे.

आता तर जगात असे प्रयोग सुरू आहेत की, त्या त्या देशातील पेशंट्सची सगळी माहिती साठवून ठेवायची आणि मशीन लर्निंगच्या सहाय्याने अमुक एक व्यक्ती, त्याच्यात अशी लक्षणं दिसली, त्याची अशी शारीरिक स्थिती होती, त्याला ही ट्रीटमेंट योग्य ठरली आणि ही नाही ठरली. यामुळे डॉक्टर्सनादेखील निदान अचूक करणं सोपं होईल. यातला पुढचा प्रयोग म्हणजे, तुमच्या हातावर एक बँड असेल, जो तुमच्या शरीरातले सगळे बदल टिपेल आणि ते एका सर्व्हरवर नोंदवले जातील. आणि तुमच्या शरीरात कुठेही कुठलाही वेगळा बदल दिसायला लागला तर तुमच्या जवळच्या व्यक्तीला आणि तुमच्या डॉक्टरला त्याची माहिती पोहचेल. जेणेकरून प्राथमिक उपचार लगेच सुरू होतील. चाकाचा शोध, विजेचा शोध आणि पुढे इंटरनेटचा शोध याने मानवी जीवन अंतर्बाह्य बदललं. या तिन्ही बदलांनी एकत्रितपणे जितकं मानवी आयुष्य बदललं त्यापेक्षा मोठा बदल कृत्रिम बुद्धिमत्ता आणणार हे नक्की.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article