मुंबईत मोठ्या गँगस्टरला अटक:छोटा राजनचा राईट हँड मानल्या जाणाऱ्या डी. के. रावला खंडणीच्या प्रकरणात अटक
6 hours ago
1
मुंबई पोलिसांनी गुरुवारी एक धडाकेबाज कारवाई करत कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याचा राईट हँड मानल्या जाणाऱ्या डी के रावसह त्याच्या 6 हस्तकांना अटक केली. या सर्वांवर येथील एका हॉटेल चालकाकडे अडीच कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणी हॉटेल मालकाने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. डी के राव हा अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याचा हस्तक आहे. त्याने येथील एका हॉटेल चालकाकडे सुमारे अडीच कोटींची खंडणी मागितली होती. ही खंडणी दिली नाही तर ठार मारण्यात येईल अशी धमकी त्याने दिली होती. या धमकीला घाबरून हॉटेल मालकाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने डी के राव याला त्याच्या 6 साथिदारांसह अटक केली. डी के राव हा छोटा राजनच्या इशाऱ्यानुसार बिल्डर्सकडून वसुलीची कामे करतो. त्यामुळे या प्रकरणात छोटा राजनचा हात आहे का? याची पडताळणी केली जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे गँगस्टर डी के रावला 2017 मध्ये खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली होती. त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाईही करण्यात आली होती. पण 2022 मध्ये त्याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यानंतर आता पुन्हा त्याला खंडणीच्याच प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई पोलिस त्याच्यावर कठोर कारवाई करतील असा अंदाज आहे. कोण आहे गँगस्टर डी. के. राव? डी के राव हा मुंबईतील कुख्यात गँगस्टर आहे. मुंबईतील गुन्हेगारी विश्वातील छोटा राजनचा खास हस्तक अशी त्याची ओळख आहे. त्याच्यावर मुंबईतील विविध उद्योजक व बिल्डरांना धमकावल्याचा आरोप आहे. त्याच्यावर खंडणी, दरोडा व अन्य गुन्हेगारी कारवायांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याला अनेकदा तुरुंगावासही भोगावा लागला आहे. डी के राव हा दिलीप मल्लेश व्होरा नावानेही ओळखला जातो. मुंबईच्या माटुंग्यात जन्मलेल्या डी के रावचे बालपण झोपडपट्टीत गेले. त्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. त्यातच तो चुकीच्या संगतीत सापडल्यामुळे त्याची पाऊले गुन्हेगारीकडे वळली. तो छोटा राजनच्या टोळीत सहभागी झाला. त्यानंतर तो छोटा राजनचा राईट हँड म्हणून ओळखला जाऊ लागला. हे ही वाचा... चहावाला 'आग' म्हणून ओरडला अन् अफवा पसरली:प्रवाशांच्या शरीराची एवढी दुर्दशा झाली होती की मी सांगूही शकत नाही -पवार पुणे - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी पुण्यात बोलताना जळगाव जिल्ह्यातील भयंकर रेल्वे अपघाताची विस्तृत माहिती दिली. रेल्वेच्या रसोईतील चहा विक्रेत्याने आग लागल्याची ओरड केली. त्यानंतर रेल्वेत एकच गोंधळ माजून प्रवाशांनी पटापट बाहेर उड्या मारल्या. या प्रवाशांना दुसऱ्या दिशेने येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने चिरडले, असे अजित पवार म्हणाले. वाचा सविस्तर
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)