पातूर येथे डीजेशिवाय दुर्गा विसर्जन; बँडच्या तालावर निघाली मिरवणूक:विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; तरूणाईचा सहभाग‎

1 hour ago 1
शहरात नवदुर्गा उत्सव उत्साहात पार पडला. शांतता व उत्सहात दुर्गा विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी जल्लोषात सहभाग नोंदवला. मिरवणुकीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीत हिंदू सेना आखाडे मंडळ मिरवडणुकीत सहभागी झाले. लहान मुलांनी लाठीकाठी आणि इतर प्रात्यक्षिक सादर केली. हिंदू सेनेचे वस्ताद परसराम उंबरकार आणि सुरेंद्र उगले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पाटील मंडळीं येथे सायंकाळी विविध प्रात्यक्षिक आणि लेझीमचे प्रकार सादर केले. यावर्षीच्या खंडित झालेली परंपरा पुन्हा सुरू करण्यात आली. शांततेत दुर्गा विसर्जन समारंभ पार पडला. यावेळी महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शंकरराव बोचरे, बालू बगाडे, संभाजी ब्रिगेडचे कैलास बगाडे, गुलाबराव गाडगे, मधुकर उगले जय श्रीराम सेनेचे मंगेश गाडगे, किरण कुमार निमकंडे, निखिल इंगळे आदी होते. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पातूरचे ठाणेदार हनुमंत डोपेवाड, सहायक पोलीस निरीक्षक गजानन तडसे, पोलीस उपनिरीक्षक अभिषेक नवघरे, पीएसआय बंडू मेश्राम, वसंत राठोड, हिंमतराव ढीगोळे, दिलीप इंगळे, सत्यजितसिंह ठाकूर यांच्यासह पोलिस तैनात होते. या मंडळांचा सहभाग : मिरवणुकीमध्ये हिंदू खाटीक महासंघ या दुर्गा उत्सव मंडळाच्या महिलांनी मिरवणुकीमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. नऊ दुर्गा उत्सव मंडळे मिरवणुकीमध्ये सहभागी झाले. यात नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ गुजरीलाईन, पिंपळेश्वर ग्रुप नवदुर्गा उत्सव मंडळ संभाजी चौक, वीर भगतसिंग मित्र मंडळ शिवाजीनगर शनिवार पुरा , भारत माता नवदुर्गा उत्सव मंडळ बाळापूर वेस, हिंदू खाटीक नवदुर्गा उत्सव मंडळ शनिवार पुरा शिवाजीनगर , श्री सिदाजी महाराज व्यायामशाळा नवदुर्गा उत्सव मंडळ, वीर संभाजी महाराज ग्रुप नवदुर्गा उत्सव मंडळ खानापूर रोड , सोपीनाथ नवदुर्गा उत्सव मंडळ पाटील मंडळी, खडकेश्वर नवदुर्गा उत्सव मंडळचा समावेश होता. डिजे पेक्षा बँड पार्टीने आणली रंगत डिजेला परवानगी नसल्याने अनेक युवकांचा भ्रमनिरास होत असतो. मात्र यावर्षी दुर्गा विसर्जन मिरवणुकीमध्ये डिजे विना मिरवणूक पार पडली. बँड पार्टीने अतिशय धमाल केली. पातूरच्या दुर्गा विसर्जन मिरवणुकीत श्री सिदाजी महाराज, खडकेश्वर मंडळ, शिव मंडळ, पिंपळेश्वर मंडळ, संभाजी महाराज व्यापारी संघटना, हिंदू खाटीक नवदुर्गा उत्सव मंडळासह अन्य मंडळांनी सहभाग नोंदवला. मिरवणूक श्री सिदाजी महाराज वेटाळ, भगत वेटाळ, तेलीपुरा, गुजरी लाईन, पाटील मंडळी, बाळापूर वेस मार्गे पाझर तलाव, तेलबुदली तलाव आणि नदी किनाऱ्यांवर देवीचे विसर्जन करण्यात आले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article