पालकमंत्र्यांवर स्थगिती नावाला; झेंडावंदन महाजन, तटकरेंकडेच:रायगड, नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून युतीत महावादळ

2 hours ago 1
नाशिक, रायगड पालकमंत्रिपदावरून महायुतीत वादाचा भडका उडाला आहे. या दोन्ही जिल्ह्यांत अनुक्रमे शिंदेसेनेचे दादा भुसे व भरत गोगावले यांचा दावा फेटाळत भाजपचे गिरीश महाजन व राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे भुसे व गोगावलेंनी इतर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वीकारण्यासही नकार दिला होता. रायगड जिल्ह्यात शिवसैनिकांनी भाजपविरोधात आंदोलनही केले. वाद टोकाला पोहोचल्याने नाराज झालेले एकनाथ शिंदे दरे या गावी निघून गेले. दरम्यान, दुसऱ्याच दिवशी सरकारने या दोन्ही पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती दिली. मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरून आल्यानंतर अंतिम निर्णय होईल, असे सांगण्यात आले. मात्र तोपर्यंत नाशिक व रायगड या दोन्ही जिल्ह्यांत २६ जानेवारीचे झेंडावंदन मात्र महाजन व तटकरे यांच्याच हस्ते होईल, असा आदेश मित्रपक्षाच्या नाकावर टिच्चून काढण्यात आला. आधी मुख्यमंत्रिपद, नंतर गृह खाते नाकारल्यामुळे नाराज झालेले एकनाथ शिंदे यांना भाजपकडून हा तिसरा झटका मानला जातो. शिंदे सरकारमध्ये रायगडचे पालकमंत्रिपद तटकरेंकडेच होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी गोगावलेंचा दावा मान्य केला नाही. पण नाशिकचे पालकमंत्री तर दादा भुसे होते, तरीही महाजनांना संधी दिल्याने नाराज झालेले शिंदे दरे (जि. सातारा) या मूळ गावी निघून गेले होते. त्यामुळे सरकारने दोन्ही पालकमंत्र्यांच्या आदेशाला स्थगिती दिली. शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी भाजप नेते दरेला जाणार असल्याची चर्चा हाेती. पण सोमवारी सायंकाळी शिंदे ठाण्यात परत आले आहेत. अपेक्षा ठेवण्यात गैर काय? : एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे : भुसे व गोगावलेंनी त्यांच्या जिल्ह्यात अनेक वर्षे काम केलेे. त्यामुळे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळवण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात गैर काय? मात्र आमच्यात कुठलेही वाद नाहीत. मुख्यमंत्री आल्यावर आम्ही त्यांच्याशी चर्चेतून यातून मार्ग काढू. नाशिकवर राष्ट्रवादीचाही दावा ‘नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे ७ आमदार आहेत. धोरणानुसार ज्यांचे आमदार जास्त, त्या पक्षाला पालकमंत्रिपद मिळायला हवे. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी आजही आग्रही आहे,’ असे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले. युतीच्या नेत्यांत चर्चेतून वाद सोडवू; बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळे : सातारा, यवतमाळ, संभाजीनगरात भाजपचे मंत्री असताना शिवसेनेला पद दिले. कोकणात राष्ट्रवादीकडे एकही पद नव्हते. त्यामुळे रायगडचे दिले. कुंभमेळ्यासाठी नाशकात महाजनांच्या नावाची मागणी होती. कुरबुरी असतील तर चर्चेतून सोडवू.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article