Published on
:
26 Jan 2025, 9:16 am
Updated on
:
26 Jan 2025, 9:16 am
पालघर : रायगड व ठाणे जिल्ह्यात बर्ड फ्लूच्या लागण झाल्याबाबत संभाव्य घटना घडल्या असताना पालघर जिल्ह्यात बर्ड फ्लू रोगाचा शिरकाव झाला नसल्याची पशुसंवर्धन विभागाने माहिती दिली आहे.
पालघर जिल्ह्यात सद्यस्थितीत असणारे २० लाख कुक्कुटपालन पक्षी पूर्णपणे सुरक्षित असून जिल्हा पशुसंवर्धन विभागाने राज्यातील काही भागात या आजाराची संभाव्य लागण लक्षात घेता आवश्यक दक्षता व प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतली आहे.
पालघर जिल्ह्यात तीन हजार पक्षांपेक्षा अधिक कूकुट पक्षी साठा असणारे ३५ नोंदणीकृत कुक्कुटपालन व्यवसायिक असून त्यांच्याकडे सद्यस्थितीत २० लाख पेक्षा अधिक कुकुट पक्षी आहेत. यापैकी सुमारे सव्वा लाख कुकुट पक्षांना लसीकरण करण्यात आले असून इतर पक्षांना लवकरात लवकर लसीकरण करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागाने हाती घेतली आहे.
जिल्ह्यामध्ये ३ हजार पक्षांपेक्षा कमी असणाऱ्या पोल्ट्री व कुक्कुटपालन व्यवसायिकांची स्थानीय पातळीवर नोंदणी करण्याचे कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. अशा छोट्या कुकूटपालन व्यवसायिकांना बर्ड फ्लू आजाराच्या शिरकाव रोखण्यासाठी जैवसुरक्षा व इतर आवश्यक उपाययोजना संदर्भात अवगत करण्यात येईल असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. मधुवंती महाजन यांनी सांगितले.
चिकन दरामध्ये बदल नाही पालघर जिल्ह्यामध्ये चिकनचे घाऊकदर १४५ ते १५० रुपये प्रति किलो इतके स्थिर असून किरकोळ बाजारात चिकन १८० ते २०० रुपये प्रति किलो इतक्या दराने विकले जात असल्याची माहिती स्थानिक विक्रेत्यांकडून प्राप्त झाली आहे. पालघर जिल्ह्यात बर्ड फ्लूचा एकही कुकुट आढळून आलेला नाही