पिंपळदरीसह परिसरात शेतकऱ्यांची मका काढणीची लगबग:थेट शेतीच्या बांधावरच आधुनिक थ्रेशर यंत्र व हार्वेस्टर
6 hours ago
1
खळे लावणे कालबाह्य पन्नास वर्षांपूर्वी बाजरी, ज्वारी, गहू, हरभरा, मका, सोयाबीन, उडीद, मूग, तूर आदी पिकांच्या मळणीसाठी खळे लावले जात होते. खळ्यामध्ये कणसे पसरवून त्यावर बैलजोडी फिरवली जात होती. एकरभर शेतीतील पिकांसाठी हे काम दिवसभर चालायचे. त्यानंतर उफणणी सुरू व्हायची. शेतकरी व शेतमजुरांसाठी खुपच कष्टाचे काम होते. आता थ्रेशरसह हार्वेस्टरच्या जमान्यात हे सारे कालबाह्य झाले आहे. बांधावर थेट थ्रेशर जात असल्याने मका काढणीचे काम वेगात पिकांची काढणी, कापणी, मळणी व उफणणीची कामे लीलया होऊ लागली आहेत. १९८५ पासून थ्रेशर यंत्र आले. गावाबाहेरील खळ्यांमध्ये पिकांची मळणी होऊ लागली. आता गेल्या पाच-सहा वर्षांपासून ट्रॅक्टरला जॉइंट असलेले भलेमोठे थ्रेशर यंत्र थेट बांधावर जाऊन पिकांच्या काढणीसह मळणीचे काम करीत आहे. प्रतिनिधी|पिंपळदरी सिल्लोड तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या मका काढणीचे कामा वेगात सुरू आहे. यामुळे तालुक्यातील पिंपळदरीसह सिद्धेश्वरनगर वाडा, सराटी, बोदवड, खंडाळा पानस, डिग्रस हळदा, वसई, जळकी, डकला,मुखपाठ, बाळापूर या परिसरातील शेतकरी याच कामात व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परतीच्या पावसाने पिकांना फटका बसल्याने उत्पन्नात घट झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे . तसेच परतीच्या पावसाने काढणी मळणीच्या कामात अडथळा निर्माण झाला होता . मात्र आता शेतकऱ्यांनी पिकांची मळणीचे कामे सर्वत्र जोरात सुरू आहेत . पूर्वी बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन आदी पिकांच्या मळणीसाठी ‘खळे’ लावले जात होते. त्यानंतर गावात थ्रेशर आले. आता तर थेट शेतीच्या बांधावरच आधुनिक थ्रेशर यंत्र व हार्वेस्टर जात असल्याने शेतकऱ्यांची मोठी सोय झाली आहे. मेहनतीसह आर्थिक बचतही झाली आहे. आता प्रत्येक गावात दोन-चार ट्रॅक्टरवर थ्रेशर मशीन असल्याने शेतीशिवारात थ्रेशरचा आवाज घुमू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांचेही काम आता अधिक वेगवान झाले आहे. तसेच सोप्या पद्धतीमुळेच आता शेतकरीही सध्या याच यंत्रांना पहिली पसंती दर्शवत आहे. यामुळे आता मोजक्याच मजुरांसह ही कामे अधिक वेगाने होताना दिसतात. सिल्लोड तालुक्याच्या परिसरात मका काढण्याच्या कामात व्यस्त शेतकरी व मजूर दिसून येत आहे छाया: गणेश घोडे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)