पीएम किसान योजनेसह लाडक्या बहिणींचे पैसे कर्ज खात्यांवर जमा:लाभार्थ्यांमध्ये नाराजी, खा. नीलेश लंके यांनी लीड बँकेचे लक्ष वेधले

2 hours ago 1
पीएम किसान योजनेचे अनुदान, तसेच लाडकी बहिण योजनेचे पैसे संबंधितांच्या खात्यावर जमा झाल्यानंतर ही रक्कम बँकांकडून परस्पर कर्ज खात्यांवर वर्ग करण्यात येत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे संबंधित योजनांच्या लाभार्थींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, बँकांच्या या कृतीवर खासदार नीलेश लंके यांनी आक्षेप घेत नगरच्या लिड बँकेकडे हा प्रकार थांबवण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे. यासंदर्भात लिड बँकेच्या व्यवस्थापकांना पाठविलेल्या पत्रात खा. लंके यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या वित्तीय व सेवा विभागाच्या १९ फेब्रुवारी २०१९च्या पीएम किसान योजनेच्या अंमलबजावणी संदर्भातील पत्रातील मार्गदर्शक सूचनेनुसार विशिष्ट परिस्थितीत मदत सहाय्य म्हणून रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग झाल्यास आयबीएच्या २१ जून २०१७ च्या मार्गदर्शक सुचनांनुसार बँकांना त्या इतर खात्यामध्ये समायोजित करण्याचा कुठलाही अधिकार नाही. पीएम किसान योजनेचा लाभ लहान आणि अल्पभुधारक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाचे समर्थन म्हणून एकरकमी शेतकरी कुटूंबाच्या हातात गेले पाहिजे. कोणत्याही थकीत कर्जाच्या समाजयोजनासह अथवा इतर कोणत्याही कारणासाठी हस्तांतरीत करू नये, असे पत्रात म्हटले आहे. बँकांची भूमिका खेदजनक ^एसएलबीसीच्या कुठल्याही मार्गदर्शक सूचना नसताना, तालुका स्तरावरील बँक अधिकारी, व्यवस्थापक शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणाऱ्या, वित्तीय संस्थांकडील पीकविमा, नुकसान भरपाई अथवा महिला खातेदारांच्या लाडकी बहिण योजनेच्या रकमा विना परवानगी त्यांच्या कर्ज खात्यांवर वर्ग करीत असून, हे अत्यंत खेदजनक आहे. - नीलेश लंके, खासदार

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article