पुढील निवडणुकीत मी असेन किंवा नसेन:ते आता ईश्वरच ठरवेन, आता कोणतीही निवडणूक लढवणार नाही, आमदार एकनाथ खडसे भावूक

2 hours ago 1
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे. मी यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही. कदाचित पुढील निवडणुकीत मी असेन किंवा नसेन. हे ईश्वरच ठरवेन, पण मला सांभाळले तसे माझी मुलगी रोहिणी खडसे यांना सांभाळा, असे त्यांनी मतदारांना उद्देशून म्हटले आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यांचा सामना शिवसेना शिंदे गटाच्या चंद्रकांत निंबा पाटील यांच्याशी होईल. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी सोमवारी मतदारांना आपल्या मुलीच्या पाठिशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे. काय म्हणाले एकनाथ खडसे? एकनाथ खडसे सोमवारी एका व्हिडिओद्वारे म्हणाले की, मी गेली अनेक वर्षांपासून आपल्यासोबत आहे. अनेक वर्षे तुम्ही मला सहकार्य केले. मला आशीर्वाद दिले. मी ही तुमच्या सुख दुःखात सहभागी झालो. कोणतीही जात-धर्म न पाळता मी सर्वांना मदत करण्याची भूमिका पार पाडली. पण आता माझी तब्येत ठीक नसते. त्यामुळे पुढील निवडणूक मी पाहणार किंवा नाही हे आता ईश्वरच ठरवेल. पुढील निवडणुकीत कदाचित मी असेन किंवा नसेनही. पण या निवडणुकीत मी आपल्याला विनंती करणार आहे की, आपण सर्वांनी रोहिणी खडसे यांना निवडून द्यावे. आपण मला सहकार्य केले तसे रोहिणी यांनाही करावे, असे खडसे मतदारांना आपल्या मुलीमागे उभे राहण्याचे आवाहन करताना म्हणालेत. कोण आहेत एकनाथ खडसे? एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेवर पाठवले आहे. 21 ऑक्टोबर 2020 रोजी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवत भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्यांनी 23 ऑक्टोबर 2020 रोजी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची घोषणा केली. पण त्यांची ही घोषणा अद्याप प्रत्यक्षात आली. त्यानंतर त्यांनी आपण अजूनही राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातच असल्याचा दावा केला. पण त्यावर अजूनही शरद पवार गटाने कोणतेही भाष्य केले नाही. एकनाथ खडसे हे महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री होते. 2009 ते 2014 पर्यंत ते विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी 1995 ते 1999 पर्यंत ते पाटबंधारे खात्याचे मंत्री होते. 2014 मध्ये राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. पण भाजपने ऐनवेळी या पदासाठी देवेंद्र फडणवीस यांची निवड करून त्यांना झटका दिला. त्यानंतर खडसे हे फडणवीस सरकारमध्ये महसूल मंत्री व कृषिमंत्री झाले. त्यांच्याकडे पशुसंवर्धन दुग्धविकास, मत्स्यपालन, राज्य उत्पादन शुल्क, अल्पसंख्याक आदी खात्यांचाही पदभार होता.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article