Published on
:
06 Feb 2025, 5:07 pm
तळेगाव : तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषदेच्या बांधकाम चालु असलेल्या नवीन इमारतीच्या वरच्या मजल्यास गुरुवारी (दि.०६) सायंकाळी ६.२०वा.सुमारास आग लागली. आगीची घटना कळताच तळेगाव दाभाडे नगर परिषद अग्नीशमन टिम, एमआयडीसी अग्नीशमन टीम, वन्यजीव रक्षक मावळ संस्था,आपत्ती व्यवस्थापन टीम,नगरपरिषदेचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिक,पोलिस कर्मचारी तत्काळ तेथे पोहोचले. या सर्वांनी सुमारे अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली.
ही आग वेल्डींगच्या कामाच्या ठिणग्यामुळे लागली. ठिणग्या फायबर ग्लासवर, प्लॕस्टीक कागदावर पडल्यामुळे आग लागली. यामुळे बांधकामाजवळील बांबू आदी बांधकाम साहित्यास आग लागली. यामध्ये जिवितहानी झाली नाही.आग लागल्याचे समजताच उपमुख्याधिकारी ममता राठोड, अग्नीशमन प्रमुख प्रमोद फुले,फायरमन ताहीर मोमीन, दीपक दोरुगडे, वन्यजीव रक्षक संस्थेचे निलेश गराडे यांनी आगीच्या ठिकाणी पाहणी केली.