पुणे : बिबट्याच्या हल्ल्यात ९ वर्षीय मुलाचा मृत्यू

2 hours ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

25 Sep 2024, 4:04 am

Updated on

25 Sep 2024, 4:04 am

नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथे वीट भट्टी मजुराच्या नऊ वर्षाच्या मुलाला बिबट्याने उसाच्या फडात ठार केले. ही घटना बुधवारी (दि. २५ )पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. बिबटयाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मुलाचे नाव रुपेश तानाजी जाधव (वय ९ वर्षं, मूळ रा. म्हैसगाव) असे आहे.

पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास रुपेश जाधव याला शौचास घेऊन त्याचे आजोबा बाहेर आले. वीट भट्टीच्या बाजूला तो शौचास बसल्यावर पाठीमागून येऊन बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. आपल्या नातवाला ओढत बिबट्या नेतोय हे पाहिल्यावर आजोबांनी आरडाओरड केली. तोपर्यंत बिबटया मुलाला घेऊन उसात पळाला होता. वीट भट्टीवर कामाला असलेले इतर मजूर आरडल्याने बिबट्याने मुलाला उसाच्या सरीत टाकून पळाला.

दरम्यान घटनेची माहिती समजताच वन विभागाचे अधिकारी प्रदीप चव्हाण व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत मुलाच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article