पुण्याच्या आंदोलकांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा; जरांगे म्हणाले, आमचा संबंध नाही:सगेसोयरे अधिसूचनेबाबत अाज मंत्रालयात बैठक

2 hours ago 3
मराठा अारक्षण अांदोलक नेते मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ पुण्याहून मुंबईत दाखल झालेल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलकांशी रविवारी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. मात्र हे आंदोलक आम्ही पाठवलेलेे नाहीत, असे जरांगे यांनी स्पष्ट केले. जरांगे यांनी पुण्यातील अांदोलकांची मध्यस्थी फेटाळल्याने राज्य सरकारच्या भूमिकेकडे अाता लक्ष लागून अाहे. दरम्यान, सहाव्या दिवशीही जरांगे यांचे उपोषण सुरूच होते. रविवारी दुपारी पुण्याच्या सकल मराठा समाज आंदोलकांच्या ७ जणांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. त्या वेळी मराठा समाजावरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, हैदराबाद गॅझेट, सातारा संस्थान आणि मुंबई गॅझेट लागू करण्यात यावे तसेच सगेसोयरेच्या अधिसूचनेवर तातडीने निर्णय घ्यावा अशा मागण्या आंदाेलकांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. सोमवारी कॅबिनेट बैठकीनंतर मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर मंत्री शंभूराज देसाईउर्वरित. पान ६ गुन्हे मागे घेण्याबाबत निर्णय : शंभूराज देसाई मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात कामकाज सुरू आहे, मात्र अधिक गतीने करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत. सोमवारी राज्य सरकार आणि माजी तीन निवृत्त न्यायमूर्तीं संदीप शिंदे, दिलीप भाेसले आणि एम. जी. गायकवाड यांच्याशी सरकार चर्चा करणार आहे. सोमवारी गृहमंत्र्यांसोबत चर्चा करून गुन्हे मागे घेण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगून आंतरवाली सराटी येथे अोबीसी नेते लक्ष्मण हाके यांचेही उपोषण सुरू अाहे. त्याबाबत बोलताना कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण आम्ही दिले आहे, असे शंभूराज देसाई म्हणाले. आंदोलक कोण अाहेत माहिती नाही : मनोज जरांगे पुण्याहून मुंबईला कोण आंदोलक,तज्ज्ञ गेले माहिती नाही. आंदोलकांच्या जिवावरच खायची सवय काही लोकांना लागली अाहे. ते पाकिस्तान,अफगणिस्तानहून आलेत की भुजबळ,फडणवीसांनी बसवले अाहेत मला माहिती नाही. - मनोज जरांगे, मराठा अारक्षण आंदोलक नेते जरांगेंच्या समर्थनार्थ मुस्लिमांची पदयात्रा संभाजीनगरातच रोखली छत्रपती संभाजीनगर | मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी क्रांती चौकातून आंतरवाली सराटीकडे निघालेली मुस्लिम बांधवांची पदयात्रा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी रविवारी मोंढा नाका उड्डाणपुलाजवळ अडवत आयोजकांवर गुन्हा दाखल केला. ६ तास पोलिसांनी डांबून ठेवल्याचा आरोप आयोजक कलीम पटेल यांनी केला. क्रांती चौकातून सकाळी ११ वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पदयात्रा रवाना झाली होती. मात्र, पोलिसांकडून त्यांची ही पदयात्रा मोंढा नाका उड्डाणपुलाजवळच अडवण्यात आली. जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी मुस्लिम समाजाचे ५ जण रविवारी अांतरवाली सराटीकडे अनवाणी रवाना झाले. त्यापूर्वी त्यांनी क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article