पुण्यातील एक नगरसेवकही बिश्नोई गँगच्या टारगेटवर File Photo
Published on
:
15 Nov 2024, 7:24 am
Updated on
:
15 Nov 2024, 7:24 am
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
बाबा सिद्दीकी यांच्यावरती गोळीबार केलेला संशयित आरोपी शिवा ठाकूर याच्या टारगेटवर पुण्यातील एक नगरसेवक देखील असल्याची पोलीस तपासात माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावरती हल्ला करणाऱ्या शिवा ठाकूर याची पोलीस कसून चौकशी करीत आहेत. या दरम्यान अनेक धक्कादायक बाबा समोर येत आहेत.
शिवा ठाकूर हा पुण्यामध्ये रद्दीच्या दुकानात अनेक महिने काम करत होता. याच दरम्यान शिवा याची ओळख शुभम लोणकर याच्याशी झाली व तो गुन्हेगारी जगताकडे वळला. शुभम लोणकरने शिवा याला आपण लॉरेन्स बिष्णोई गँगचे असल्याचे सांगितल्यानंतर त्याचा त्याच्यासोबत संपर्क वाढला व त्यानंतर त्याला या कटात सहभागी करून घेतला.
परंतु, आता बाबा सिद्दिकी आणि जिशान सिद्दिकी यांचा हत्येचा कट रचत असताना पुण्यातील एक नगरसेवक देखील बिश्नोई गँगच्या टारगेटवरती असल्याचे शिवा याने पोलिसांना सांगितले आहे. या धक्कादायक माहितीमुळे खळबळ उडाली आहे.