पुतण्याने विळ्याने केली काकाची हत्या:शेतीच्या वादातून बार्शीटाकळी तालुक्यातील बोरगाव खुर्द येथील घटना
2 hours ago
1
शेतातील पाइपलाइनवरून बैलगाडी का घातली, या क्षुल्लक कारणावरून वाद घालत पुतण्याने काकाची हत्या केल्याची घटना बार्शीटाकळी तालुक्यातील बोरगाव खुर्द येथे रविवारी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास निर्गुणा नदीच्या पुलावर घडली. याप्रकरणी पिंजर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली आहे. पिंजर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरगाव खुर्द येथील शेतकरी गोपाळ मोतीराम ढोरे (४८) हे २४ नोव्हेबर रोजी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास शेतातून बैलगाडी घेऊन घराकडे जात असताना नदीवरील पुलावर त्यांचा पुतण्या विशाल विलास ढोरे (२२) याने त्यांच्याशी शेतातील पाइपलाइनवरून बैलगाडी का घातली तसेच शेतात बैल का चरावयास सोडला, यावरून वाद घालत निर्गुणा नदीच्या पुलावर लोखंडी विळ्याने काका गोपाळ ढोरे यांच्या डोक्यात सपासप मारून ठार मारले. याप्रकरणी तेजस तुळशिराम ढोरे (१९) याच्या फिर्यादीवरून पिंजर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. घटनेची माहिती मिळताच पिंजर पोलिस ठाण्याचे ठाणेदार गंगाधर दराडे, उपनिरीक्षक गजानन रहाटे, बीट जमादार दत्तात्रय चव्हाण, सुमेध मोहळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपीला अटक केली. ठाणेदार दराडे आणि पीएसआय गजानन रहाटे पुढील तपास करत आहेत.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)