पुरुष, महिलांसाठी स्वतंत्र दर्शनरांगा, केडगाव, बुऱ्हाणनगर येथे घटस्थापना:पारंपरिक ढोल-ताशांचा गजर, बालवारकऱ्यांचा सहभाग

2 hours ago 1
शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त नगर शहरापासून सात किमी अंतरावर असलेल्या बुऱ्हाणनगर देवी मंदिरात विधिवत १२ वाजता, तर केडगाव येथील रेणुका माता मंदिरात सकाळी नऊ वाजता घटस्थापना करण्यात आली. शहराजवळील या दोन्ही ठिकाणी नवरात्रौत्सवात एक लाखांवर भाविक दर्शन घेतील, असा अंदाज आहे. दर्शनासाठी महिला-पुरूष भाविकांसाठी स्वतंत्र रांगा व बॅरिगेट्सची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरासह जिल्हाभरात विविध देवी मंदिरात पारंपरिक ढोल-ताशे, तसेच बालवारकऱ्यांनी सहभाग घेतला. केडगाव येथे श्री रेणुकामाता मंदिरात राज्यभरातील भाविक दर्शनासाठी येतात. केडगाव ग्रामस्थ व देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिरात घटस्थापनेचा मान यंदा सातपुते कुटुंबाला मिळाला. ओंकार सातपुते व धनश्री सातपुते यांच्या हस्ते विधीवत पूजा करून घटस्थापना केली. देवीला पारंपरिक आभूषणे परिधान करण्यात आली होती. मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पुजारी दत्तात्रय गुरव, शंकर गुरव, रवींद्र गुरव, गणेश गुरव, तुषार गुरव, शेखर गुरव, सुनील गुरव, रामभाऊ गुरव, शुभम गुरव आदींनी पौराोहित्य केले. उर्वरित पान चारवर बुऱ्हाणनगर येथे मिरवणुकीत पारंपरिक खेळाचे प्रात्यक्षिक दाखवताना मुलगी. बुऱ्हाणनगरला सामाजिक उपक्रम बुऱ्हाणनगर येथे येणाऱ्या भाविकांच्या दर्शनासाठी विशेष नियोजन आखण्यात आले आहे. महिला व पुरुष स्वतंत्र रांगा असून, सभामंडपात बॅरिगेट लावण्यात आले आहे. दररोज सुमारे दहा ते पंधरा हजार भाविक दर्शनासाठी येतात. त्याचबरोबर आरोग्याची काळजी घेण्यासाठी शिबिरांचेही आयोजन केले आहे, असे अॅड. अभिषेक भगत यांनी सांगितले. एमआयडीसीत आरोग्य शिबिरे एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान येथे गुरुवारी आमदार संग्राम जगताप व शितल जगताप यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. मंदिरा आकर्षक विद्युत रोषणाई करुन आकर्षक पाण्याचे कारंजा व कमान उभारण्यात आली आहे.त्याचबरोबर आरोग्य शिबिर, रक्तदान, होमहवन, देवीचा गोंधळ व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article