पैशांचा "रात्रीचा खेळ’ थांबवण्यासाठी बारा मतदारसंघात ३६ ड्रोनची नजर:प्रचाराला आलेल्यांनी ३८ तासांत मतदारसंघ सोडावे; अन्यथा कारवाई : ओला
3 days ago
1
निवडणुकीसाठीचा प्रचार सोमवारी सायंकाळी थांबला.जिल्ह्यातील १२ मतदारसंघात मतदारांना रात्रीच्या वेळी मतदानासाठी पैशांचे आमिष दाखवून ते देणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. जिल्ह्यातील १२ मतदारसंघात प्रत्येकी तीन अशा ३६ ड्रोनचा वॉच या पैसे वाटपावर राहणार आहे. दरम्यान, प्रचार थांबल्यानंतर पुढच्या ३८ तासांत प्रचारासाठी मतदारसंघात दाखल झालेल्यांनी मतदार संघ सोडावेत, अन्यथा २३३ प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी सोमवारी दिला. निवडणुकीचा प्रचार सोमवारी थांबला. या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. प्रशासनाने त्याची तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यात ३७ लाख ८३ हजार ९८७ मतदार आहेत. यात पुरुष मतदार १९ लाख ४६ हजार ९४४, महिला मतदार १८ लाख ३६ हजार ८४१ आहेत. मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदार केंद्रांवर महिला व पुरुष मतदारांसाठी स्वतंत्र रांगा असतील. जिल्ह्यात ३६० जाहिरातींचे माध्यम प्रमाणे करण व सह नियंत्रण समितीने प्रामाणिकरण केले आहे. समाज माध्यमातून सुरू असलेल्या जाहिरातीबद्दल ५१ जणांना नोटिसा बजावल्या आहेत. आचारसंहिता भंगाच्या २१७ तक्रारी विधानसभा निवडणुकीसाठी संगमनेर मतदारसंघातील सतीची वाडी व शिर्डी मतदारसंघातील तरकसवाडी हे दोन मतदान केंद्र क्रिटिकल म्हणून घोषित करण्यात आले आहेत. तेथे अतिरिक्त पोलिस बंदोबस्त राहील. आतापर्यंत आचारसंहिता भंगाच्या २१७ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी २३ जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर असून त्या वगळल्या. योग्य तक्रारी ११६ होत्या.३२ मिनिटांत तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. १७ हजार १६९ टपाली मतदान जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात सोमवार अखेरपर्यंत १७ हजार १६९ टपाली मतदान झाले आहे. यामध्ये ८५ पेक्षा अधिक वय असलेल्या २ हजार १७३, दिव्यांग ३४०, निवडणुकीच्या कामात असलेले अधिकारी कर्मचारी १४ हजार २७८, अत्यावश्यक सेवेतील ५६, सैनिक ३२२ जणांनी मतदान केले आहे. निवडणुकीच्या कर्तव्यास असलेले जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी सोमवारी टपाली मतदानाचा हक्क बजावला.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)