अरबपती आपल्या गर्लफ्रेंडला हाताला धरून नोटांच्या गालिचावर चालवताना दिसत आहे.Pudhari File Photo
Published on
:
17 Nov 2024, 11:32 pm
Updated on
:
17 Nov 2024, 11:32 pm
मॉस्को : भरपूर पैसे कमवण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयत्न करतात. त्यासाठी काही लोक उत्तम शिक्षण घेतात, तर काहीजण शिक्षण अर्धवट सोडून धंद्याच्या मागे लागतात. ज्यांना नशीब साथ देते, ते श्रीमंत होतात. गरीब लोक ज्या पैशांनी श्रीमंत झाले की, ते त्या पैशांचा वापर विचारपूर्वक करतात, तर काही लोक जन्मानेच श्रीमंत असतात आणि त्यांना पैशांची किंमत कळत नाही. पैशांची उधळपट्टी करणारा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये, एक अरबपती त्याच्या गर्लफ्रेंडला हेलिकॉप्टरमधून उतरवत आहे आणि दोघेही नोटांच्या गालिचावरून हळूहळू चालत आहेत. व्हिडीओमध्ये दिसते की, हेलिकॉप्टर एका जागी उभे आहे आणि त्याच्या समोर नोटांच्या बंडल्स ठेवले आहेत. अरबपती आपल्या गर्लफ्रेंडला हाताला धरून नोटांच्या गालिचावर चालवताना दिसत आहे. गर्लफ्रेंरडदेखील त्याच्याशी हसत-हसत चालत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ एका व्हेरिफाईड अकाऊंटवरून शेअर केला गेला आहे. या व्यक्तीचे नाव सेर्गेई कोसेन्को आहे. व्हिडीओमध्ये सेर्गेई आपल्या गर्लफे्रंडसोबत दिसत आहे. व्हिडीओमध्ये, सेर्गेई हेलिकॉप्टरमधून आपल्या गर्लफे्रंडला खाली उतरताना दाखवतो आणि नोटांच्या गालिचावर चालण्याचे द़ृश्य दाखवतो. सेर्गेई हा एक व्यवसायी आणि सोशल मीडियावर इंफ्लूएंसर आहे. इंस्टाग्रामवर सेर्गेई स्वतःला ‘आर्टिस्ट’ म्हणवून घेतो. या व्हिडीओमुळे लोक त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. एका व्यक्तीने लिहिलं की, ‘सर, मला हे पैसे मिळाले तर बरं होईल, मला जीवनात खूप काही साध्य करायचं आहे.’ दुसर्या व्यक्तीने लिहिलं की, ‘पैशाला महत्त्व न देणारे लोकच जास्त खूप पैसे कमवतात.’ काही लोकांनी या नोटांना बनावट समजून लिहिलं की ‘या पैशांद्वारे काहीही खरेदी करता येणार नाही.’ हा व्हिडीओ आतापर्यंत 40 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे आणि हजारो लोकांनी लाईक, शेअर केले आहे. या व्हिडिओवर अनेक कमेंटस् आल्या आहेत. काहींनी मात्र या व्हिडीओला ट्रोलही केले आहे. ही निव्वळ पैशांची उधळपट्टी, असे या नेटिझन्सनी म्हटले आहे.