यावेळी माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, जुनी पेन्शन कोअर कमिटीचे राज्य सचिव महेंद्र हिंगे, जुनी पेन्शन संघटनेचे समन्वयक वैभव सांगळे, सचिन वाकचौरे, भीमाशंकर तोडमल, तौसिफ शेख, डी.डी. कपाळे, एल.एम. गावडे, ए.डी. देंडगे, एस.बी. गायकवाड, भानुदास बेरड, ए.वाय. साबळे, डी. आरोटे, एन.जी. गीते, एस.जे. शर्मा आदींसह शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिक्षण विभागाकडून 14 नोव्हेंबर रोजी पत्र काढले असून, वर्ग खोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत सक्ती केलेली आहे.
तथापि शासन आदेशानुसार शालेय परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. त्याचा खर्च शाळेनी केलेला आहे. परंतु प्रत्येक वर्ग खोल्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा खर्च शाळांना परवडणारा नाही. तसेच अपार आयडीमध्ये कामकाज करताना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. पालकांकडून सहकार्य मिळत नाही, म्हणून शंभर टक्के अपार आयडीच्या नोंदणीसाठी सक्ती करू नये, अन्यथा शिक्षकांनी या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.