प्रशांत किशोर यांच्या पक्षाची घटना तयार, उमेदवारांसाठी आचारसंहिता जाहीर

1 hour ago 1

दोन वर्षांच्या पायी पदयात्रा केल्यानंतर 2 ऑक्टोबर रोजी प्रशांत किशोर आपल्या नव्या जन सुराज पक्षाचे लॉचिंग करणार आहे. बिहारची राजधान पाटणा येथील वेटर्नरी कॉलेजमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नवीन पक्षाच्या लॉंचिंग संपूर्ण तयारी केली आहे. पार्टी चिन्हांसह घटना देखील तयार करण्यात आली आहे. जन सुराज पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार याला अंतिम रुप दिले जात आहे. जन सुराजच्या घटनेत दोन तरतूदी एकदम नवीन आहेत.

पहिल्या निर्णयानूसार या पक्षातील उमेदवारांसाठी निवडणूकीला उभे राहण्यासाठी किमान शैक्षणिक अर्हता निश्चित करण्यात आली आहे. जन सुराजच्या घटनेनुसार दुसरी एक घोषणा करण्यात आली आहे. ती देखील इतर राजकीय पक्षांपेक्षा अगदी भिन्न आहे. ही दूसरी व्यवस्था म्हणजे मतदारांना ‘राइट टू रिकॉल’चा अधिकार देण्यात आला आहे.  देशाच्या आतापपर्यंतच्या इतिहास या दोन व्यवस्थांना कोणत्याही पार्टीने आतापर्यंत लागू केलेले नाही.

जन सुराजच्या घटनेत नेमके काय – काय नियम आहेत?

1.पक्षाचे नाव जन सुराज असणार आहे, हा राष्ट्रीय पातळीवरील पक्ष असणार आहे. निवडणूक आयोगाकडे या नवीन राजकीय पक्षाची नोंदणी झालेली आहे. परंतू निवडणूक

2. राष्ट्रीय पातळीवर पक्षात अध्यक्ष असणार आहे. अध्यक्षानंतर संघटनेचे महासचिव पदाची निर्मिती केलेली आहे. याशिवाय पक्षात उपाध्यक्ष आणि सचिव देखील पद असणार आहे.राष्ट्रीय स्तरावर सेंट्रल कमिटी सर्वात पॉवरफुल असणार आहे. कमिटीत 19-21 मेंबर असतील

3. सेंट्रल कमिटी देखील मोठे निर्णय घेऊ शकते. प्रशांत किशोर देखील या सेंट्रल कमिटीत सदस्य असू शकतील. सेंट्रल कमिटीत सर्व वर्गांना सहभागी करुन काम चालवण्यावर भर देण्यात येणार आहे.

4. निवडणूक तिकटासाठी पार्टीने आपल्या घटनेत उमेदवरांसाठी किमान अर्हता निश्चित केली आहे. सूत्रांच्या मते 10 उत्तीर्ण व्यक्ती त्यासाठी पात्र होतील. आधी पार्टी 12 वी उत्तीर्ण अशी अट ठेवली होती, परंतू काही सदस्यांनी यामुळे दलित आणि वंचित वर्गासाठी राजकारणात काही संधी मिळणार नाही.

5. जन सुराजच्या घटनेत ‘राईट टू रिकॉल’ची व्यवस्था करण्यात आली आहे. यानूसार जिंकलेल्या उमेदवारांनी त्यांनी जनतेला दिलेली वचने पूर्ण न केल्यास, त्यांना पद सोडावे लागणार आहे. अण्णा आंदोलनाच्या वेळी याची चर्चा झाली होती. परंतू कोणत्याही पक्षाने याला अद्याप लागू करण्याचे धाडस दाखविलेले नाही.

6. जन सुराजच्या घटनेत फ्रंट संघटनेचा देखील उल्लेख केला आहे.वर्तमानात 3 (महिला, युवा आणि शेतकरी ) फ्रंटल संघटनेत जन ससुराजमध्ये यातील समाज घटक देखील वाढवू शकते.

2 ऑक्टोबर रोजी घोषणा, 1 कोटी लोकांपर्यंतस पोहचण्याची रणनीती

2 ऑक्टोबर रोजी पाटणात जन सुराज नावाच्या पक्षाचे अधिकृत घोषणा केली जाईल. या बैठकीत पक्षाच्या अध्यक्षाच्या नावाची देखील घोषणा केली जाणार आहे. जन सुराज पक्षात अध्यक्ष पदी दलित समुदायातील राजकीय नेत्याची वर्णी लागणार असल्याचे म्हटले जात आहे. अध्यक्षपदाच्यासाठी देखील स्पर्धा आहे. तीन जणांमध्ये यासाठी चुरस असली तरी एका नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. दुसरी वर्षी अध्यक्ष पद अति मागास वर्गाकडे, तिसऱ्या वर्षी मुस्लीम समुदायाकडे तर चौथ्यावर्षी मागास समुदायातील व्यक्तीला हे पद मिळेल. पाचव्या वर्षी हे पद सवर्ण समुदायासाठी आरक्षित असतील.

जन सुराजने स्थापनेनंतरही 1 कोटी लोकांपर्यंत पोहचण्याचे लक्ष्य ठेवले आहे. वर्तमान काळात बिहारात सुमारे 12 कोटी लोकसंख्या आहे. निवडणूक आयोगाच्या मते बिहार एकूण मतदारांची संख्या 7 कोटी 64 लाख 33 हजार 329 इतकी आहे. यात 4 कोटी 29 लाख पुरुष आणि 3 कोटी 64 लाख महिला मतदार आहेत.

पोट निवडणूक लिटमस टेस्ट

जन सुराज पार्टी बिहारात विधानसभेसाठी वर्षअखेरीस पोट निवडणूका होणार आहेत. कैमूर येथील रामगड, गया येथील इमामगंज आणि बेलागंज तसेच भोजपूरच्या तरारी या मतदार संघात पोट निवडणूक होणार आहे.पीके बिहार विधानसभा निवडणूक 2025 वर फोकस ठेवून आहेत. बिहारात ऑक्टोबर 2025 मध्ये विधानसभेच्या 243 जागांवर मतदान होणार आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article