फडणवीस महाराष्ट्र वाऱ्यावर टाकून नेहमीच फिरत असतात:एकनाथ शिंदे पक्ष बदलतील; त्यांना बिनखात्याचे मंत्री केले तरी ते पद सोडणार नाही- संजय राऊत
1 day ago
2
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र वाऱ्यावर टाकून नेहमीच फिरत असतात. आधी दावोसला होते, आता दिल्ली प्रचार उद्या अन्य कुठेतरी जातील असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, फडणवीसांनी आपल्यावर महाराष्ट्राची काही जबाबदारी आहे हे लक्षात घेतले पाहिजे. परत असे आहे की ते भाजपचे स्टार प्रचारक आहे. महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाने जागा जिंकल्या आहेत. त्यांचे श्रेय त्यांना मिळत आहे. अन् महाराष्ट्राचा फॉर्म्युला जर दिल्लीत वापरला तर प्रचार न करता भाजप दिल्लीत जिंकेल. दिल्ली छोटे राज्य म्हणून दयाबुद्धीने विचार होऊ शकतो संजय राऊत म्हणाले की, फडणवीस यांना दिल्लीच्या प्रचारासाठी जाण्याची गरज नाही. त्यांनी महाराष्ट्रातील निवडणुकीचा फॉर्म्युला आणि पॅकेज जर तिथे वापरायचे ठरवले असेल तर बुथवर जाण्याची गरज नाही. पण दिल्ली छोटे राज्य असून त्यासाठी दयाबुद्धीने विचार करु शकतात असा टोलाही त्यांनी लगावला आहे. गणेश नाईक शिंदेंना सिनिअर संजय राऊत म्हणाले की, गणेश नाईक हे एकनाथ शिंदेंना सिनिअर आहेत. त्यांनी जनता दरबार लावला तर चुकीचे काय आहे. गणेश नाईक शिवसेनेत असताना मंत्री होते, तेव्हा एकनाथ शिंदे कुठे होते ते कुठेच नव्हते. त्यांचा आवाका आणि अनुभव मोठा आहे. एक मंत्री म्हणून लोकांचे प्रश्न सोडवण्याचा
त्यांना अधिकार आहे. एकनाथ शिंदेंनीही फिरावे, नवी मुंबईत जावे. तेही मंत्री आहेत तिथेही महानगरपालिका आहे. पण एकनाथ शिंदे रुसून बसले आहेत असे मला कळाले आहे. संजय राऊत म्हणाले की, गणेश नाईक हे भाजपचे नेते आहेत. त्यापूर्वी ते राष्ट्रवादी आणि शिवसेनेत होते. त्यांचा प्रवास फार मोठा आहे. तर एकनाथ शिंदेंनी आता एक पक्ष बदलला आहे. ते जेव्हा भविष्यात दोन 3 पक्ष बदलतील मला शक्यता वाटत आहे.तेव्हा त्यांची आणि गणेश नाईक यांची पक्षबदलण्याची स्पर्धा होऊ शकेल. ते कधीच मी नाराज असे बोलणार नाही संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे फार हुशार आहेत. ते तंत्रज्ञानाचा वापर करत असतील. ते नाराज आहेत की नाही हे त्यांनी स्वत सांगितले पाहिजे. त्यांचे बॉस फडणवीस यांनी सांगावे ते नाराज आहेत, पण ते मंत्रीपदाचा चिटकून बसले त्यामुळे ते नाराज आहे असे वाटत नाही. त्यांना बिनखात्याचे मंत्री केले तरी ते मंत्रीपद सोडणार नाही. त्यांला हिंमत लागते कारण त्यांच्या डोक्यावर तपास यंत्रणाची तलवार आहे.त्यामुळे ते मी नाराज आहे असे कधीच बोलणार नाही. मुंडेंच्या दिल्लीवारीवरही टीका संजय राऊत म्हणाले की, धनंजय मुंडे हे अजित पवार गटाचे मंत्री आहेत. पण त्यांना खुलासा देण्यासाठी दिल्लीत अमित शहा यांच्याकडे जावे लागत आहे. त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बारामती, पुण्यात बसलेले आहेत. पण त्यांचा मंत्री खुलासा देण्यासाठी दिल्लीत जातो ही महाराष्ट्राची अवस्था आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)