​​​​​​​फडणवीस यांच्या बंगल्यावर मोठ्या घडामोडी:भाजप नेत्यांची झाली बैठक, खास रणनीतीवर चर्चा; नांदगावकरांनी घेतली देवेंद्र यांची भेट

5 hours ago 1
मराठी मुलुखाचा नवा कारभारी कोण होणार? हे उद्या स्पष्ट होईल. पण तत्पूर्वी, सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडीच्या गोटातील हालचालींना प्रचंड वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी आपल्या सागर बंगल्यावर बोलावलेल्या बैठकीला मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी हजेरी लावली. यामुळे एक्झिट पोल्समध्ये महायुतीला कौल मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असला तरी, देवेंद्र फडणवीस यांच्या गोटात मात्र 'प्लॅन बी'वर जोरात काम सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. 288 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेसाठी बुधवारी मतदान झाले. त्यानंतर आता शनिवारी मतमोजणी होऊन राज्यात कुणाचे सरकार येणार हे स्पष्ट होणार आहे. राज्यात 145 हा बहुमताचा जादुई आकडा आहे. बुधवारी मतदानानंतर लागलीच जाहीर झालेल्या एक्झिट पोल्समध्ये महायुती हा जादुई आकडा गाठेल असा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी भाजपच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. बाळा नांदगावकरही बैठकीला हजर या बैठकीला भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, पराग शाह, मिहीर कोटेचा, कालीदास कोळंबकर, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर आदी नेते हजर होते. या बैठकीत महायुतीलाी स्पष्ट बहुमत न मिळाल्याच्या स्थितीत पुढील रणनीती काय असू शकेल? या मुद्यावर सल्लामसलत झाली. विशेषतः निकालानंतर सर्व आमदारांना एकत्र आणण्याची खास जबाबदारी काही विश्वासू नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे या बैठकीला मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे सुद्धा हजर राहिले. यामुळे राजकीय विश्लेषकांनी भुवया उंचावल्या आहेत. महायुतीमध्ये योग्य समन्वय असल्याचा दावा विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या तिन्ही घटकपक्षांच्या प्रमुख नेत्यांची अद्याप एकही बैठक झाली नाही. पण त्यांच्यात योग्य समन्वय असल्याची माहिती आहे. दुसऱ्या बाजूने भाजपने बंडखोर उमेदवारांसह अपक्ष व छोट्या पक्षांशी बोलणी करून आपले राजकीय समीकरण साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. उद्या निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीतर्फे यासंबंधीची बोलणी सुरू केली जाईल. त्या दृष्टिकोनातून फडणवीस यांच्या शासकीय बंगल्यावरील आजची बैठक महत्त्वाची मानली जात आहे. नांदगावकरांचा लग्नपत्रिका देण्यासाठी आल्याचा दावा दुसरीकडे, बाळा नांदगावकर यांनी आपला या बैठकीशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कालीदास कोळंबकर यांच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका देवेंद्र फडणवीस यांना देण्यासाठी आम्ही आलो होतो, असे ते म्हणाले. उल्लेखनीय बाब म्हणजे भाजपने शिवडी मतदारसंघात बाळा नांदगावकर यांना पाठिंबा दिला होता. नांदगावकरांनी यासंबंधी त्यांचे आभारही मानले. हे ही वाचा... नाना पटोलेंचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र:फॉर्म 17 सी भाग दोन, फेरीनिहाय तक्त्यासह अंतिम निकालाच्या प्रतीची केली मागणी मुंबई - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्या जाहीर होणाऱ्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मतमोजणीत कोणतीही गडबड होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेत आहेत. यासंबंधी त्यांनी थेट राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून फॉर्म 17 सी भाग 2 सह इतर काही दस्तावेजांची मागणी केली आहे. वाचा सविस्तर

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article