Published on
:
25 Jan 2025, 12:33 am
Updated on
:
25 Jan 2025, 12:33 am
सोलापूर : बहुप्रतीक्षित सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर-गोवा या मार्गावर पुढील 100 दिवसांत विमानसेवा सुरू होणार असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले होते. त्यातच आता फ्लाय 91 कंपनीने 72 सीटर क्षमतेच्या विमासेवेला डीजीसीआयकडे परवानगी मागितली आहे. त्यामुळे विमानसेवा सुरू होण्यास आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.
याआधी फ्लाय 91 कंपनीला 42 सीटर विमानसेवा सुरू करण्यास डीजीसीआयने परवानगी दिली आहे. आता 72 सीटर विमासेवेला परवानगी मागितली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्यांनी दिली आहे. याआधी डिसेंबर 2024 मध्येच विमानसेवा सुरू होणार होती. परंतु डिसेंबर 2024 आणि जानेवारी 2025 च्या पंधरवड्यापर्यंत दाट धुके असल्याने विमानसेवा सुरू करणे पुन्हा एकदा लांबणीवर पडले होते.
सोलापूर हे व्हिज्युअल उड्डाण नियमांसह अगदी नवीन विमानतळ आहे आणि या कालावधीनंतर कोणत्याही नवीन एअरफिल्डवर ऑपरेशन सुरू करणे नेहमीच विवेकपूर्ण आहे. हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे, असे स्पष्ट केले होते. फ्लाय 91 कंपनीचे सर्व संबंधित अधिकार्यांनी अंतिम मंजुरी मिळविण्यासाठी आणि आवश्यक इंधन भरण्याच्या पायाभूत सुविधांच्या दिशेने काम सुरु केले आहे.