बहुमत असो किंवा नसो, अपक्षांना सोबत घेणार:भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा; लाडक्या बहिणींच्या मतदानावर विश्वास
3 hours ago
1
राज्यात मतांचा टक्का वाढला आहे. राज्यातील लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात मतदान केले असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. वाढलेल्या मतदानाचा आम्हाला फायदा आम्हाला होईल, असा दावा देखील बावनकुळे यांनी केला आहे. राज्यात महायुतीला बहुमत मिळाले तरी किंवा नाही मिळाले तरी सत्ता स्थापन करताना अपक्षांना सोबत घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. राज्यात महायुती पुन्हा सत्ता स्थापन करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज्यात बहुमता पेक्षा जास्त आमदार आमचे निवडून येतील, असे देखील बावनकुळे यांनी म्हटले आहे. आम्हाला सत्ता स्थापनेसाठी अपक्ष आमदारांची गरज भासली तरी त्यांची मदत घेणार आणि गरज भासली नाही तरी देखील त्यांची मदत घेतली जाणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. निवडून आलेला आमदार हा लोकांचा प्रतिनिधी असतो. निवडून आल्यानंतर त्याच्या मतदारसंघात विकासाची कामे होणे आवश्यक आहे. त्यामुळे बहुमत असले किंवा नसले तरी अपक्ष आमदार विकासासाठी भारतीय जनता पक्षाच्या बाजूने राहतील असा दावा देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. त्यामुळे राज्यात देखील डबल इंजिनचे सरकार हवे, असे महाराष्ट्रातील जनतेचे मत आहे. त्यामुळे राज्यात महायुती सरकार येणार असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. राज्यभरातील लाडक्या बहिणींनी आम्हाला मोठ्या प्रमाणात मतदान केले असल्याचा दावा देखील बावनकुळे यांनी केला आहे. महायुतीला 150 प्लस जागा भारतीय जनता पक्षाला 105 पेक्षा जास्त जागा मिळणार असून महायुतीला 150 पेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. इतकेच नाही तर अपक्ष उमेदवार हे विकासासाठी आमच्या बाजूने असतील, असा दावा देखील बावनकुळे यांनी केला आहे. केंद्रात भाजपचे सरकार असल्यामुळे राज्यात देखील भाजप सरकार स्थापन होणार असल्याचा दावा त्यांनी केला. इतकेच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची देखील राज्यात चांगली कामगिरी आहे, असा दावा त्यांनी केला आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा.... राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार:काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत यांचा दावा; एक्झिट पोलवर विश्वास नसल्याचेही केले स्पष्ट राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार स्थापन होणार असल्याचा विश्वास काँग्रेसचे नेते तथा नागपूर उत्तर विधानसभा मतदाररसंघातील उमेदवार डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील जनतेची पहिली पसंती महाविकास आघाडी असल्याचा दावा देखील त्यांनी केला. विविध संस्थांनी दाखवलेल्या एक्झिट पोलवरही त्यांनी साशंकाता व्यक्त केली आहे. एक्झिट पोलमधील अंदाज हा खरा नसतो, असेही त्यांनी म्हटले आहे. पूर्ण बातमी वाचा.... राज्यातील राजकारणावर सट्टा बाजारातही वातावरण तापले:मोठ्या प्रमाणात उलाढाल; बहुमत कोणाला? कोणत्या पक्षाचे सरकार येणार? महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेनंतर आता सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा आहे. मात्र यातच विविध संस्थांच्या वतीने एक्झिट पोलच्या माध्यमातून राज्यात सरकार कोणाचे येणार? यावर अंदाज मांडण्यात येत आहे. याच अंदाजात सर्वात महत्त्वाचा असतो तो सट्टा बाजार. राज्यातील सट्टा बाजारात सुद्धा राज्याच्या निवडणुकीवरून चांगलेच वातावरण तापले आहे. 23 नोव्हेंबर रोजी कुणाला बहुमत मिळणार आणि कोणत्या पक्षाचे सरकार येणार? हे स्पष्ट होणार असले तरी यामुळे सट्टा बाजारात चांगलीच उलाढाल झाल्याचे दिसून येत आहे. पूर्ण बातमी वाचा.... तारापूर एमआयडीसीत कारखान्याला भीषण आग:अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीजवळील एका कारखान्याला आज भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या बाबत अद्याप अधिकची माहिती मिळू शकली नाही. पूर्ण बातमी वाचा....
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)