अरे IPO आहे की लॉट्री! 100 टक्के परतावा देणारे 7 IPO कोणते? जाणून घ्या

2 hours ago 1

गुंतवणूक केली की परतावा देखील चांगला मिळावा, हे अगदी सर्वांनाच अपेक्षित असतं. अशीच एक माहिती आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 2024 या वर्षात IPO मार्केटमध्ये सातत्याने अॅक्शन पाहायला मिळाली. या वर्षीबद्दल बोलायचे झाले तर आतापर्यंत IPO गुंतवणूकदारांसाठी लॉटरीसारखे ठरले आहेत.

100 टक्के परतावा

यंदाच्या एकूण IPO पैकी 7 असे आहेत ज्यात गुंतवणूक करणाऱ्यांना 100 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. म्हणजे किमान गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट-तिप्पट किंवा त्याहूनही अधिक झाले आहेत. तर 4 IPO ने 90 ते 100 टक्क्यांदरम्यान परतावा दिला.

नव्याने सूचीबद्ध झालेल्या शेअर्समध्ये निगेटिव्ह झोनमध्ये मोजकेच शेअर्स असले तरी असे 5 IPO आहेत, ज्यात गुंतवणूकदारांचे पैसे 30 ते 40 टक्क्यांनी कमी झाले आहेत.

ज्योती सीएनसी ऑटोमेशन (Jyoti CNC Automation )

परतावा: 254 टक्के शेअर बाजारात कधी लिस्ट झाला- 16 जानेवारी 2024 रोजी

IPO ची किंमत 331 रुपये होती, तर लिस्टिंगच्या दिवशी शेअर 433 रुपयांवर बंद झाला. लिस्टिंगच्या दिवशी या शेअरने IPO च्या किमतीच्या तुलनेत 30.86 टक्के परतावा दिला. हा शेअर सध्या IPO च्या किमतीपेक्षा 253.69 टक्के मजबूत म्हणजे 1170.70 रुपयांवर व्यवहार करत आहे.

केआरएन हीट एक्सचेंजर आणि रेफ्रिजरेशन (KRN Heat Exchanger and Refrigeration)

परतावा: 235.27 टक्के शेअर बाजारात कधी लिस्ट झाला- 3 ऑक्टोबर 2024 रोजी

IPO ची किंमत 220 रुपये होती, तर लिस्टिंगच्या दिवशी शेअर 478.45 रुपयांवर बंद झाला. लिस्टिंगच्या दिवशी या शेअरने IPO च्या किमतीच्या तुलनेत 117.48 टक्के परतावा दिला. हा शेअर सध्या 737.60 रुपये म्हणजेच IPO च्या किमतीपेक्षा 235.27 टक्क्यांनी मजबूत आहे.

प्लॅटिनम इंडस्ट्रीज (Platinum Industries)

रिटर्न: 148.19 टक्के शेअर बाजारात कधी लिस्ट झाला- 5 मार्च 2024 रोजी

शेअर बाजारात लिस्ट झाला होता. लिस्टिंगच्या दिवशी आयपीओची किंमत 171 रुपये होती, तर शेअर 220.90 रुपयांवर बंद झाला. लिस्टिंगच्या दिवशी या शेअरने IPO च्या किमतीच्या तुलनेत 29.18 टक्के परतावा दिला. हा शेअर सध्या 424.40 रुपये म्हणजेच IPO च्या किमतीपेक्षा 148.19 टक्के मजबूत आहे.

भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom)

परतावा: 145.52 टक्के शेअर बाजारात कधी लिस्ट झाला- 12 एप्रिल 2024 रोजी

IPO ची किंमत 570 रुपये होती, तर लिस्टिंगच्या दिवशी शेअर 813.75 रुपयांवर बंद झाला. लिस्टिंगच्या दिवशी शेअरने IPO च्या किमतीच्या तुलनेत 42.76 टक्के परतावा दिला. हा शेअर सध्या 1399.45 रुपये म्हणजेच IPO च्या किमतीपेक्षा 145.52 टक्के मजबूत आहे.

प्रीमियर एनर्जीज लिमिटेड (Premier Energies Limited)

परतावा: 142.92 टक्के शेअर बाजारात कधी लिस्ट झाला- 3 सप्टेंबर 2024 रोजी

IPO ची किंमत 450 रुपये होती, तर लिस्टिंगच्या दिवशी शेअर 839.65 रुपयांवर बंद झाला. लिस्टिंगच्या दिवशी या शेअरने IPO च्या किमतीच्या तुलनेत 86.59 टक्के परतावा दिला. हा शेअर सध्या 1093.15 रुपये म्हणजेच IPO च्या किमतीपेक्षा 142.92 टक्के मजबूत आहे.

ओरिएंट टेक्नॉलॉजीज (Orient Technologies)

परतावा: 115.80 टक्के शेअर बाजारात कधी लिस्ट झाला- 28 ऑगस्ट 2024 रोजी

लिस्टिंगच्या दिवशी IPO ची किंमत 206 रुपये होती, तर शेअर 304.45 रुपयांवर बंद झाला. लिस्टिंगच्या दिवशी या शेअरने IPO च्या किमतीच्या तुलनेत 47.79 टक्के परतावा दिला. हा शेअर सध्या 444.55 रुपये म्हणजेच IPO च्या किमतीपेक्षा 115.80 टक्के मजबूत आहे.

गाला प्रिसिजन इंजिनीअरिंग (Gala Precision Engineering)

परतावा: 109.38 टक्के शेअर बाजारात कधी लिस्ट झाला- 9 सप्टेंबर 2024 रोजी

IPO ची किंमत 529 रुपये होती, तर लिस्टिंगच्या दिवशी शेअर 787.05 रुपयांवर बंद झाला. लिस्टिंगच्या दिवशी या शेअरने IPO च्या किमतीच्या तुलनेत 48.78 टक्के परतावा दिला. हा शेअर सध्या 1107.60 रुपये म्हणजेच IPO च्या किमतीपेक्षा 109.38 टक्के मजबूत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article