हनीमूनचा प्लॅन आखताय का? असं असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. हनीमून लग्ना इतकाच महत्त्वाचा आहे. नव्या जोडप्याला एकमेकांना समजून घेण्याची ही चांगली संधी असते. पण कपल्ससाठी लग्नानंतर चांगलं लोकेशन शोधणं, हे एक मोठं अवघड काम आहे. पण, चिंता करू नका आम्ही तुम्हाला काही खास डेस्टिनेशन्सची माहिती देणार आहोत. जाणून घ्या.
अंदमान निकोबार
हिमाचल आणि उत्तराखंडसारख्या ठिकाणी पैसे खर्च करण्याची तुमची तयारी नसेल तर शांत निळे पाणी, पांढरी वाळू आणि हिरवळीने भरलेल्या अंदमान निकोबार या बेटाला आपले हनीमून डेस्टिनेशन बनवा. अंदमान आणि निकोबार बेट त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. हनीमूनकरणाऱ्यांमध्ये हे ठिकाण खूप लोकप्रिय आहे. स्कूबा डायव्हिंगही येथे करता येते.
पाँडिचेरी
पाँडिचेरी याला ‘द लिटिल पॅरिस’ असेही म्हणतात. त्यातून आपल्यात फ्रेंच संस्कृती जागृत होते. इथे झाडं, व्हिला, शांत समुद्रकिनारे आणि आलिशान दुकानांनी वेढलेल्या रस्त्यांचं सौंदर्य तुमचं मन जिंकेल. हनीमूनसाठी पाँडिचेरी हे खास ठिकाण आहे. कमी गर्दीच्या ठिकाणी जायचं असेल तर इथे जाण्याचा प्लॅन करू शकता.
हे सुद्धा वाचा
गोवा
गोवा हे जोडप्यांचे आवडते राज्य आहे. ज्यांना बजेटमध्ये मजा करायची आहे त्यांच्यासाठी गोवा परफेक्ट आहे. येथे तुम्हाला गोल्डन बीच, व्हायब्रंट कल्चर आणि बजेटफ्रेंडली हॉटेल्स सहज पाहायला मिळतील. इथे खूप बजेटफ्रेंडली होमस्टे आहे.
कोडईकनाल
तामिळनाडूत कोडईकनालचे नाव या यादीत नक्कीच येईल. कारण हनिमूनसाठी शांत जागा शोधणाऱ्यांना ही जागा आवडते. हिरव्यागार पश्चिम घाटात वसलेले हे एक शांत हिल स्टेशन आहे. हे ठिकाण दक्षिण भारतातील सर्वाधिक मागणी असलेल्या हिल स्टेशनपैकी एक मानले जाते.
खंडाळा
खंडाळा हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे. डिसेंबरमध्ये सिमला-मनालीसारख्या ठिकाणी लोक जातात, तर शांततेच्या शोधात असलेले लोक खंडाळ्यात हनीमूनसाठी प्लॅन करतात.
हनीमून लग्नाइतकाच महत्त्वाचा आहे. नव्या जोडप्याला एकमेकांना समजून घेण्याची ही चांगली संधी असते. त्यामुळे तुम्ही आम्ही सांगितलेल्या वरील डेस्टिनेशनचा विचार करू शकतात. हनिमूनला जायचं म्हणल्यावर पैशाचा प्रश्न आलाच. बजेटनुसार तुम्ही वरील डेस्टिनेशन ठरवू शकता. जास्त पैसे खर्च करून सुंदर लोकेशन्स किंवा महागड्या डेस्टिनेशन्समध्येही फिरता येतं आणि स्वस्तातही चांगला प्लॅन आखता येतो. शेवटी आनंद मिळायला हवा कारण महागड्या ठिकाणी आनंद मिळाला नाही तर त्याचा काहीही उपयोग नाही.