जोडीदाराबरोबर क्वॉलिटी टाईम घालवण्यासाठी चांगल्या हॉटेलच्या आपण शोधात असतो. पण, अशी हॉटेल कुठे शोधावी हे समजत नाही. तुम्ही जपानमध्ये गेल्यास तुम्हाला एक प्रकारची खास हॉटेल दिसेल. जपानी लव्ह हॉटेलमध्ये तुम्हाला छुपा कॅमेऱ्याची चिंता बिलकुल सतावणार नाही. कपल्सची प्रायव्हसी लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या या हॉटेल्समध्ये लाईटिंग, म्युझिक सिस्टीम आणि बाथटब सारख्या सुविधाही आहेत.
1968 मध्ये पहिल्यांदा ओसाका हॉटेलसाठी जपान लव्ह हॉटेल हा शब्द वापरण्यात आला. आज ही संकल्पना केवळ जपानपुरती मर्यादित राहिलेली नाही. तर जगभरात अशी हजारो हॉटेल्स सुरू आहेत. यामुळे जोडप्यांना प्रेमाचे क्षण घालवण्यासाठी एकटे राहण्याची जागा उपलब्ध झाली.
या हॉटेल्स युद्धोत्तर काळाची आठवण करून देते जेव्हा बहुतेक तरुण जोडपी त्यांच्या कुटुंबासह राहत होती, म्हणूनच जोडीदाराबरोबर दर्जेदार वेळ घालवण्यासाठी अशी हॉटेल्स म्हणजेच जपानी लव्ह हॉटेल्स खूप लोकप्रिय झाली. त्यासंबंधीच्या काही रंजक गोष्टींबद्दल या लेखात तुम्हाला सविस्तर माहिती दिली आहे. वाचा..
हे सुद्धा वाचा
जपानची लव्ह हॉटेल संकल्पना काय?
शहरापासून दूर काही काळ प्रेमाचा क्षण घालवण्यासाठी खास आणि आरामदायी जागेच्या शोधात असलेल्या जोडप्यांसाठी ही लव्ह हॉटेलची सुविधा खूप फायदेशीर आहे. लव्ह हॉटेल्स, नावाप्रमाणेच जोडप्यांसाठी खास डिझाईन केलेली हॉटेल्स आहेत. ही हॉटेल्स पारंपरिक हॉटेल्सपेक्षा बरीच वेगळी आहे. हे हॉटेल दिवस किंवा रात्री नव्हे तर तासानुसार बुक केले जातात.
सुरुवात कधी झाली?
जपानमध्ये 1968 मध्ये अशी हॉटेल्स ओसाकामध्ये सुरू झाली. आज जपानमध्ये अशी हजारो हॉटेल्स आहेत. ही हॉटेल्स प्रसिद्ध असण्याचे मुख्य कारण म्हणजे ते जोडप्यांना वैयक्तिक आणि सुरक्षित वातावरण देतात. या हॉटेल्समध्ये अनेकदा रोमँटिक थीम असलेल्या खोल्या, विशेष सोयी-सुविधा आणि प्रायव्हसीवर विशेष भर दिला जातो.
लाइटिंग शो
हॉटेल्समध्ये अंतराळयान, लेणी किंवा समुद्राखालील दृश्य यासारख्या रोमांचक विषयांवर आधारित आहेत. लाइटिंग शो आणि आरामदायी वातावरणासह या हॉटेल्समध्ये इंटिरिअर डिझाईन देखील खास आहे. प्रायव्हसी लक्षात घेऊन पाहुण्यांना पूर्णपणे वैयक्तिक अनुभव घेता यावा, या हॉटेल्समध्ये खिडक्या बनवल्या जात नाहीत.
लव्ह हॉटेल महामार्गांपासून जवळ
लव्ह हॉटेल्स शहराच्या बाहेर किंवा महामार्गाच्या आसपास आहेत, जेणेकरून पाहुणे सहज पोहोचू शकतील. याशिवाय या हॉटेल्समध्ये जोडप्यांसाठी जकूजी, मूड लाइटिंग, बाथटब आणि विविध प्रकारच्या कम्फर्टेबल बेड्स अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत.
‘लव्ह हॉटेल’ अनेक देशांमध्ये प्रसिद्ध
आशियाखंडातील इतर अनेक देशांमध्येही लव्ह हॉटेल्स प्रसिद्ध आहेत. दक्षिण कोरिया आणि थायलंड सारख्या काही देशांमध्ये लव्ह हॉटेलला ‘मोटेल’ असेही म्हणतात. बऱ्याच हॉटेलच्या खोल्या कॅप्सूल-आकाराच्या आहेत.