Published on
:
28 Nov 2024, 9:15 am
Updated on
:
28 Nov 2024, 9:15 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगलादेशमध्ये 'इस्कॉन' वर बंदी घालण्याबाबत स्वतःहून आदेश देण्यास ढाका उच्च न्यायालयाने नकार दिला आहे, असे वृत्त बांगलादेशमधील 'द डेली स्टार'ने दिले आहे. वकील मोनीर उद्दीन यांनी बुधवारी (दि.२७) 'इस्कॉन'वर बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती.
इस्कॉन ही एक जातीय अशांतता भडकणारी संघटना असल्याचा दावा वकील मोनीर उद्दीन यांनी केला होता. ही संघटना पारंपारिक हिंदू समुदायांवर आपल्या श्रद्धा लादत असल्याचा आरोपही केला होता. तसेच बांगलादेशला अस्थिर करण्याचा आणि भारतीय माध्यमांशी सहयोग करण्याचा आरोपही केला होता.
The High Court today refused to pass a suo motu (voluntary) order on banning #ISKCON's activities in #Bangladesh today after being informed that the authorities concerned have taken necessary measures in this regard.https://t.co/2yg1RseW8V
— The Daily Star (@dailystarnews) November 28, 2024जनतेच्या रक्षणाबाबत सरकारने सावध राहावे
मोनीर यांच्या याचिकेवर बांगलादेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती फराह महबूब आणि न्यायमूर्ती देबाशीष रॉय चौधरी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. बांगलादेशमधील कायदा आणि सुव्यवस्थेबरोबरच जनतेच्या मालमत्तेचे रक्षण करण्याबाबत सरकारने सावध राहिले पाहिजे, असे खंडपीठाने सरकारला सुनावले.
चिन्मय कृष्णांच्या अटेकच्या निषेधार्थ झाली होती निदर्शने
बांगलादेशात राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी ३० ऑक्टोबर रोजी चिन्मय कृष्ण दास प्रभू यांच्यासह १९ जणांवर देशद्रोह कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी दोघांना अटकही करण्यात आली आहे. 25 ऑक्टोबर रोजी सनातन जागरण मंचने चितगाव येथील लालदिघी मैदानावर आठ कलमी मागण्या घेऊन रॅली काढल्याचा आरोप आहे. यावेळी चौकात असलेल्या आझादी स्तंभावर काही लोकांनी भगवा ध्वज फडकावला होता. या ध्वजावर आमी सनातनी असे लिहिले होते. याबाबत चिन्मय कृष्ण दास यांच्यावर राष्ट्रध्वजाचा अवमान आणि अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.