Baba Siddique Death Updates : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात रात्रभरात अनेक घडामोडी घडल्या. काल रात्रीपासून या प्रकरणात नेमकं काय- काय घडलं? बाबा सिद्दिकी यांच्या पोस्ट मार्टमबाबतची माहिती काय? बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील सर्व अपडेट्स, वाचा सविस्तर....
बाबा सिद्दिकीImage Credit source: Facebook
माजी मंत्री, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, नेते बाबा सिद्दीकी यांच्या निधनानंतर बांद्रा परिसरात भावपूर्ण श्रद्धांजलीचे बॅनर लावण्यात आले आहेत. काल रात्री साडेनऊच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली गेली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर एक हल्लेखोर अद्याप फरार आहे. पकडलेल्या दोन हल्लेखोरांपैकी एक उत्तर प्रदेशचा तर दुसरा हरियाणाचा आहे.