Published on
:
13 Oct 2024, 2:18 am
Updated on
:
13 Oct 2024, 2:18 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : अजित पवार गटाचे वांद्रे येथील नेते माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांची शनिवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. गोळीबार करणारे दोन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार आहे. गोळीबारात वापरलेली पिस्तूल पोलिसांनी जप्त केली असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
बाबा सिद्दीकी यांच्यावर ३ ते ४ राऊंड फायर करण्यात आले. यातील एक गोळी त्यांच्या छातीला लागली. यानंतर त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला. निवडणुकीपूर्वीच त्यांची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. १५ दिवसांपूर्वी त्यांना जीवे धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.