बार्शीटाकळीत गतिरोधक नसल्याने अपघाताची भिती:मुख्य रस्त्यावर गतिरोधक नसल्याने वाहने धावतात सुसाट
2 hours ago
1
अकोला शहरातून अमरावती, वाशीम व यवतमाळ जिल्ह्यात जाण्यासाठी व नागपूर मुंबई या समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी, सध्या सोयीचा मार्ग बार्शीटाकळी शहरातून जातो. या रस्त्यावरून प्रवाशी वाहनासोबतच गौण खनिजाचे ट्रक, लांब पल्ल्याची माल वाहतूक करणाऱ्या गाड्या ये-जा करत असतात. पोलिस विभागाचे सुद्धा याकडे लक्ष नसते. वाहतूक पोलिस केवळ बाहेर जिल्ह्यातील वाहनांच्या नंबर प्लेट पाहून त्यांना थांबवून आपले भले करुन घेण्यात मग्न असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक १५-२० मिनिटाला व रेल्वे फाटक उघडल्यानंतर वाहतुकीचा खोळंबा होणे, हे नित्याचेच झाले आहे. कुणी कसेही वाहन चालवतो. गतिरोधक नसल्यामुळे वाहनांच्या वेगावर नियंत्रण येत नाही. रेल्वे फाटक उघडल्यावर पुढे जाण्याच्या शर्यतीत सुसाट वाहने पिटाळतात. त्यातच बायपास चौकात पेट्रोल पंप असल्यामुळे पंपातून बाहेर पडणारा वाहनचालकसुद्धा मुख्य रस्त्यावर येतो. त्यातून अनेकदा अपघात घडलेले आहेत. यावर उपाय म्हणजेच पेट्रोल पंपावर जाण्या- येण्याच्या रस्त्यावर व बायपास चौकात पिंपळखुटा फाट्या अगोदर गतिरोधक तयार करणे अत्यंत जरूरी आहे. याबाबत अनेकदा मागणी करुनही ढिम्म प्रशासनाने अद्याप याची दखल घेतलेली नाही. गतिरोधक बसवणार ^बार्शीटाकळी शहरातून जाणाऱ्या वर्दळीच्या मुख्य रस्त्यांवर शक्य तेवढ्या लवकर या ठिकाणी गतिरोधक बनवण्यात येईल. - पद्माकर वानखडे, अभियंता, राष्ट्रीय महामार्ग
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)