बाळापुरात मतदान केलेला व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

2 days ago 1

बाळापुरात मतदान केलेला व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.Pudhari Photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

20 Nov 2024, 3:39 pm

Updated on

20 Nov 2024, 3:39 pm

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे एका तरुणाने मतदान कक्षामध्ये उमेदवाराच्या चिन्हाचा व मतदान करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. याप्रकरणी त्याच्याविरूध्द आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळमनुरी विधानसभा मतदार संघातील आखाडा बाळापूर येथील संतोष शिवाजी आमले या तरुणांनी मतदान केंद्रात मतदान करण्यासाठी जाताना मोबाईल घेऊन जात प्रवेश केला. मतदान करते वेळेस त्याने व्हिडिओ तयार केला या व्हिडिओमध्ये त्याने मतदान यंत्र, मतदान यंत्रावरील निशाणी आणि मतदान केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. म्हणून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी अतुल मस्के यांच्या फिर्यादीवरून बाळापूर येथील रहिवासी असलेले संतोष शिवाजी आमले यांच्याविरुद्ध आदर्श आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास जमादार रामदास ग्यादलवाड करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article