बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त दोन्ही शिवसेना आमने-सामने:खात्री पटेल तेव्हा स्वबळाचे सांगतो, मनपा निवडणुकीत सूड उगवाच- उद्धव ठाकरे

3 hours ago 2
मुंबई ते नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका उद्धवसेना स्वबळावर लढणार असे ११ जानेवारी रोजी खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले होते. मात्र, उद्धव ठाकरेंचा अद्याप स्वबळाचा निर्णय झालेलाच नाही, असे उद्धव ठाकरेंनी गुरुवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मेळाव्यात जाहीर केले. ते म्हणाले, मी मुंबई, छत्रपती संभाजीनगरसह सर्व ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांशी बोललो आहे. त्या सर्वांचा एकट्याने लढण्याचा आग्रह आहे. मात्र, याविषयी मला कार्यकर्त्यांची जिद्द, तयारी बघू द्या. माझी खात्री पटल्यानंतर मी स्वबळाचे सांगतो. मात्र, तुम्ही महापालिका निवडणुकीत गद्दार आणि त्यांच्यावर वरदहस्त ठेवणाऱ्यांचा सूड उगवा. अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयमवर झालेल्या या मेळाव्यात उद्धव यांनी मोदी, अमित शाह, भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली. अमित शाह किस झाड की पत्ती वाघ आणि पंजा काय असतो आता दिसेल. मराठी माणसाच्या नादी लागू नका. औरंगजेबाला झुकवलं. तिथे अमित शाह किस झाड की पत्ती असा थेट हल्ला करत उद्धव ठाकरे शिंदेंना उद्देशून म्हणाले की, मनपात तुमची काय वाट लागते ते पहा. घरातून स्वबळावर लढता येत नाही; शिंदेंचा ठाकरेंना टोला बाळासाहेब ठाकरेंचे विचार पायदळी तुडवणाऱ्यांनी त्यांच्या स्मारकात जाण्यापूर्वी नाक घासून माफी मागावी, असे आव्हान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना दिले. स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी मनगटात ताकद लागते. घरात बसून स्वबळावर लढता येत नाही. कार्यकर्त्यांसोबत काम करावे लागते असा टोलाही त्यांनी लगावला. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या मेळाव्यात ते म्हणाले की, बाळासाहेबांचे विचार, दिघे साहेबांचा मंत्र आणि शिवसेना हे चार शब्द आपले गॉडफादर आहेत. मुंबई मनपासह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी करा, असे आवाहनही त्यांनी केले. फडणवीसांविरुद्ध मोठे निर्णय ‘अभी तो नापी है मुठ्ठीभर जमीन, अभी पुरा आसमान बाकी है!’ असे सांगत असे सांगत फडणवीसांविरुद्ध वर्चस्वाच्या लढाईत मोठ्या निर्णयाचे संकेतही शिंदे यांनी दिले. अदृश्य शक्ती मोदी-शाह यांचा शिंदेंना पडला विसर उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड पुकारल्यावर शिंदेंनी आपल्यामागे ‘अदृश्य शक्ती’ म्हणजे मोदी, शाह असल्याचे म्हटले होते. मात्र, गुरुवारी झालेल्या मेळाव्यात शिंदेंना अदृश्य शक्तीचा िवसर पडला. ते म्हणाले की, आता आपले कोणीही गॉड फादर नाही! ‘जय श्रीराम’च्या उन्मादाला ‘जय शिवराय’ने प्रत्युत्तर द्या अयोध्येत ‘जय श्रीराम’ म्हणून उन्माद सुरू आहे. महाराष्ट्रात तुम्ही ‘जय श्रीराम’च्या उन्मादाला जय शिवराय, जय श्रीराम असे प्रत्युत्तर द्या. हिंमत असेल तर भाजपने त्यांच्या झेंड्यातील हिरवा रंग काढून दाखवावा, असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article