बाेपदेव घाट अत्याचार प्रकरण:घटनेनंतर तिघे दुचाकीने गेल्याची माहिती मिळाली अन् गँगरेपचे आराेपी पकडले

2 hours ago 1
इव्हेंट मॅनेजमेंटच्या शिक्षणासाठी सुरतहून पुण्यात आलेली २१ वर्षीय तरुणी तिच्या मित्रासाेबत ७ दिवसांपूर्वी काेंढवा परिसरातील सासवडच्या दिशेने जाणाऱ्या बाेपदेव घाटात फिरावयास गेली. त्या वेळी काेयत्याचा धाक दाखवून मद्यप्राशन केलेल्या तिघांनी तिच्या मित्रास बांधून ठेवत तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला हाेता. या प्रकरणातील आराेपी शोधण्यासाठी पोलिस तांत्रिक आणि पारंपरिक पद्धतीने तपास करत होते. तपासादरम्यान, कोंढवा परिसरातील एका व्यक्तीने पोलिसांना तीन जण घटनेच्या दिवशी दुचाकीवर ट्रिपलसीट कच्च्या रस्त्याने गेल्याची माहिती दिली. त्याआधारे मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करत पोलिसांनी आरोपींचा माग काढला. त्यावेळी एका हॉटेल आणि पेट्रोल पंपावर तिघांचे स्पष्ट फुटेज मिळाले. त्यानंतर पोलिसांनी एका आरोपीस उंड्री भागातून ताब्यात घेकले. सदर आरोपी मूळचे मध्य प्रदेशमधील रहिवासी असून मजुरीच्या नावाखाली गुन्हेगारी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पाेलिसांनी या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेचे ३० पथके व इतर ३० पथके अशी एकूण ६० पथके कार्यरत केली हाेती. त्याशिवाय जुने पाेलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची देखील मदत घेऊन त्यांना तपास कामात सक्रिय केले. सदर घटना ही अमावास्येच्या दुसऱ्या दिवशी घडल्याने घाट परिसरात सदर जागी रात्री अंधार असल्याने आराेपींना पाहणारे प्रत्यक्षदर्शी इतर काेणी नव्हते, माेबाइल नेटवर्क नसल्याने तांत्रिक तपास पाेलिसांना करता आला नाही. घाट परिसरात सीसीटीव्ही कुठे नसल्याने व जे उपलब्ध सीसीटीव्ही हाेते त्याची दृश्यमानता स्पष्ट नसल्याने तपासात अडथळे जाणवले. आराेपींनी पीडित तरुणी व तिच्या मित्राचे माेबाइल सुरुवातीला घेऊन जाताना परत त्यांना केले हाेते तसेच त्यांना शस्त्राचा धाक दाखवून धमकावत घटनास्थळावरुन आम्ही गेल्यानंतर १५ मिनिट बाहेर यायचे नाही, असे बजावल्याने आराेपी नेमक्या काेणत्या दिशेला पळून गेले याचा थांगपत्ता लागत नव्हता. पाेलिसांनी सुरुवातीला दाेन दिवस तांत्रिक तपासावर भर देत सुमारे पाच हजार माेबाइलचा डम डाटा काढून त्याचे विश्लेषण केले. आराेपींचे रेखाचित्र तयार करुन त्याद्वारे तपास करत संशयित ४५० ते ५०० सराईत आराेपींची चाैकशी करण्यात आली. यापूर्वीही आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केल्याचा पोलिसांना संशय एका मोटारसायकलवर संशयित तीन जण एका रस्त्याने जात असल्याचे दिसून आल्यानंतर सदर मार्गावरील सखोल तपासणी करून आरोपींचे वाहन निष्पन्न करण्यात आले. आरोपी चोरीच्या उद्देशाने घाटात गेले होते आणि त्यांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. यापूर्वी देखील आरोपींनी अशाच प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी प्रकार केल्याचा संशय असून त्याबाबत सखोल चौकशी करण्यात येत आहे. एका आरोपीवर बलात्काराचा गुन्हा यापूर्वी दाखल असून चोरीचे गुन्हे त्यांच्यावर यापूर्वी दाखल आहे. घाट परिसरातील रस्त्यांचे ड्रोन मॅपिंग, ढाबे, पेट्रोल पंप दुकानांतील सीसीटीव्हीची पाहणी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, ही घटना घडल्यानंतर दोन दिवस पोलिसांनी घटनास्थळ परिसरात दोन्ही बाजूनी ये -जा करणाऱ्या रस्त्यांचे ड्रोन मॅपिंग केले. घाटाच्या परिसरातील विविध कच्चे आणि पक्के रस्ते पोलिसांना दिसून आले. त्यानुसार वेगवेगळी पोलिस पथके सदर ठिकाणी जाऊन त्यांनी आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. सदर रस्त्यांवरील ढाबे, ,पेट्रोल पंप, दुकानांची सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. ७०० संशयित डबल सीट, ट्रिपलसीट जाणाऱ्या दुचाकींची तपासणी करण्यात आली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article