एक हजार विद्यार्थिनींना मोफत एचपीव्ही प्रतिबंधक लस:बालिका दिनानिमित्त रोटरी प्रियदर्शिनीचा उपक्रम

2 hours ago 1
नगरच्या रोटरी क्लब प्रियदर्शिनीच्या वतीने ११ ऑक्टोबरला साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून शहरातील विविध शाळांमधील ९ ते १८ वर्षे वयोगटातील एक हजार विद्यार्थिनींचे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग (एचपीव्ही) प्रतिबंधक लसीचे मोफत लसीकरण केले. रोटरी प्रियदर्शिनीच्या सर्व सदस्यांनी गेल्या दीड महिन्यांपासून अनेक शहरातील शाळा, झोपडपट्टी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल भागांमध्ये जाऊन विद्यार्थिनी, शिक्षक आणि पालक यांच्याशी चर्चा करून तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली गर्भाशय मुखाच्या कर्करोगाबद्दल जनजागृती केली. पेमराज सारडा महाविद्यालयातील विद्यार्थिनी वस्तीगृहात आयोजित या शिबिराचे उद्घाटन ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सचे अशोक बोरा व हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक यांनी दीपप्रज्वलन करून केले. यावेळी रोटरी प्रियदर्शिनी क्लबच्या अध्यक्ष मिनल बोरा, सचिव स्वाती गुंदेचा, सविता काळे, कॅन्सर पेशंट्स असोसिएशनच्या डॉ. नुपूर खरे, प्रा. माणिक विधाते, प्राचार्या डॉ.माहेश्वरी गावित, छायाताई फिरोदिया, प्रतिभा धूत आदी उपस्थित होते. रोटरी प्रियदर्शिनीच्या अध्यक्षा बोरा म्हणाल्या, सर्व्हायकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा महिलांमध्ये आढळणारा दुसरा सर्वात गंभीर कर्करोग आहे. या कर्करोगामुळे दरवर्षी लाखो महिलांचा मृत्यू होतो. त्यामुळे या जीवघेण्या आजारापासून येणाऱ्या पिढीचे रक्षण होण्यासाठी या मोफत लसीकरण शिबिराचा उपक्रम रोटरी क्लब प्रियदर्शनीने हाती घेतला. या उपक्रमास पेमराज सारडा कॉलेज, मुंबई येथे १९६९ साली स्थापन झालेल्या कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन आणि नगरच्या एसके एव्हीएएम चॅरिटेबल फाउंडेशनचे विशेष सहकार्य लाभले. मुलींचे भविष्य सुरक्षित करणे हेच प्रमुख ध्येय रोटरी क्लबचे अध्यक्षपद स्वीकारतांनाच या उपक्रमाची मी घोषणा केली होती. मुलींचे भविष्य सुरक्षित करणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. शहरातील बालिकांना या जीवघेण्या कर्करोगापासून सुरक्षित करण्याचा माझा व क्लबचा मानस होता. गर्भाशय मुखाचा कर्करोग हा संसर्गजन्य रोग आहे. तो २०३० पर्यंत नष्ट करण्याचा संकल्प आम्ही सर्वांनी केला आहे, असे मिनल बोरा म्हणाल्या.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article