बोईसरमध्ये खंडित वीजपुरवठ्याने व्यावसायिक त्रस्त

2 hours ago 1

बोईसरमध्ये विद्युत पुरवठा खंडित होण्याने विविध व्यावसायिक वीजग्राहक त्रस्त झाले आहेत. file photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

11 Oct 2024, 11:19 am

Updated on

11 Oct 2024, 11:19 am

बोईसर : संदीप जाधव बोईसर पूर्व भागातील बेटेगाव, मान, वारंगडे, गुंदले, लालोंडे, नागझरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून महावितरण विद्युत पुरवठ्यात अचानक बिघाड होत असल्याने सकाळपासून संध्याकाळपर्यंत अचानक कधीही वीज गायब होत आहे. त्यामुळे व्यावसायिकांची तारांबळ उडत आहे.

व्यावसायिकांमधून संताप व्यक्त 

सततच्या विद्युत पुरवठा खंडित होण्याने विविध व्यावसायिक वीजग्राहक त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे ऐन दिवाळीच्या सणात विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने व्यवसाय बंद पडत असल्यामुळे व्यावसायिकांवर संक्रांत येण्याची वेळ आल्याने व्यावसायिक संताप व्यक्त करीत आहेत बेटेगाव, टाटा हाउसिंग, वारांगडे आणि गुंदले या चार वीज उपकेंद्रातून साधारण ८० ते ९० आदी गावांतील शेतीपंपासह घरगुती उपकरण व विविध व्यवसायासाठी वीजपुरवठा केला जातो.

व्यवसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान 

या परिसरात मोठ्या प्रमाणात विविध अनेक छोट्या मोठ्या कंपन्या, स्टोन क्रशर व्यवसाय, विविध प्रक्रिया उद्योग सुरू झाले आहेत. त्या सर्व उद्योग व्यवसायांना शेतीपेक्षा जादा दराने वीजपुरवठा केला जातो. गेल्या आठवडाभरापासून महावितरणकडून वीज पुरवठा अचानक खंडित होत आहे. त्यामुळे प्रामुख्याने स्टोन क्रशर व्यवसायिक अडचणीत आले आहेत. सततचा वीज पुरवठा खंडित होत असल्याने अनेक व्यवसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.

गेल्या दोन तीन दिवसांपासून संबंधित गावांच्या व्यवसायासाठी असणारी वीज सकाळ, दुपार, संध्याकाळच्या वेळेस कधीही गायब होऊन कधीही येत आहे. या कालावधीत विविध व्यावसायिकांचे काम वेगाने सुरू असते. मात्र, वीज गेल्यानंतर अनेक कंपन्यांना तसेच व्यावसायिकांना लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article