उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, खासदार प्रफुल्ल पटेल असे दिग्गज नेते उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत अभिनेता सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
अभिनेता सयाजी शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
महाराष्ट्राच्या राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रातली सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज जाहीरपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. सयाजी शिंदे यांनी अनेक चित्रपट, नाटकात काम केलं आहे. तसेच त्यांनी फक्त मराठी नाही तर हिंदी, तेलगू, तमिळ चित्रपटांमध्येही मोठं काम केलं आहे. सयाजी शिंदे हे त्यांच्या सामाजिक कार्यामुळे देखील प्रसिद्ध आहे. सयाजी शिंदे यांनी पर्यावरणाचा समतोल राहावा यासाठी स्वत:हून पुढे येत लाखो झाडे लावली आणि त्यांना मोठं केलं. त्यांनी निर्माण केलेल्या सह्याद्री देवराईचं सर्वत्र कौतुक झालं. सयाशी शिंदे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशामुळे पक्षालादेखील फायदा होण्याची शक्यता आहे.